ससूनमध्‍ये किटकजन्‍य आजारांच्या १२०० रुग्‍णांवर उपचार

ससूनमध्‍ये किटकजन्‍य आजारांच्या १२०० रुग्‍णांवर उपचार
Published on

पुणे, ता. २२ ः ससून रुग्‍णालयात जून महिन्‍यापासून सप्‍टेंबर महिन्‍यापर्यंत डासांपासून प्रसारित होणाऱ्या ११९३ किटकजन्‍य रुग्‍णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्‍ये डेंगी, चिकुनगुनियाचे रुग्‍ण सर्वाधिक असून मलेरियाचे केवळ सहा रुग्‍ण आहेत.
पावसाळा सुरू झाल्‍यापासून शहरात किटकजन्‍य आजारांत वाढ झाली. ससूनमध्‍ये जूनपासून सप्‍टेंबरपर्यंत डेंगी, चिकुनगुनियाच्‍या रुग्‍णांची संख्‍या ही अनुक्रमे ६८८ व ४९९ इतकी होती. तसेच मलेरियाचेही ६ रुग्‍ण आढळून आले होते. यापैकी बाह्यरुग्‍ण विभागापैकी ॲडमिट केलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या जास्‍त आहे, अशी माहिती ससून रुग्‍णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्‍लपा जाधव यांनी दिली. त्‍याचप्रमाणे लेप्‍टोस्‍पायरोसिसच्‍या २७५ रुग्‍णांवर उपचार केले गेले, असेही त्‍यांनी सांगितले.
दरम्‍यान, खासगी वैद्यकीय रुग्‍णालयांमध्‍येही किटकजन्‍य आजारांची संख्‍या वाढली आहे. त्‍यांनी त्‍यांच्‍याकडील रुग्‍णांची माहिती महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाला देणे आवश्‍यक आहे. मात्र, ती माहिती देणे बंधनकारक असताना ती नाकारली जात आहे. त्‍यामुळे रोग नियंत्रणात आणण्यासाठी अडथळा येत असून शहरातील खासगी रुग्‍णालये, निदान केंद्रे आणि अगदी राष्‍ट्रीय विषाणू विज्ञान संस्‍था (एनआयव्‍ही) देखील शहरातील संसर्ग, रोग आणि उद्रेकाची माहिती नाकारत असल्‍याची तक्रार महापालिकेच्‍या आरोग्‍य विभागाकडून करण्‍यात येत आहे. आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की वारंवार स्मरणपत्रे आणि माहितीसाठी सूचना देऊनही ही माहिती दिली जात नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com