गौड ब्राह्मण समाजातर्फे स्मरणिकेचे प्रकाशन

गौड ब्राह्मण समाजातर्फे स्मरणिकेचे प्रकाशन
Published on

पुणे, ता. २८ : कुडाळदेशकर गौड ब्राह्मण समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात समाजाच्या स्मरणिकेचे प्रकाशन नुकतेच झाले. यावेळी अभिनेते प्रसाद पंडित, तालगुरू पं. सुरेश सामंत, दिग्दर्शक-संगीतकार अजय नाईक, मनीष दाभोलकर, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू मिलिंद सामंत, अनुराधा खानोलकर, प्रकाशक नितीन हिरवे उपस्थित होते. पंडित म्हणाले, ‘‘एकत्र येऊन सर्वांचे स्मरण व्हावे म्हणून स्मरणिका काढली आहे.’’ नाईक म्हणाले, ‘‘माणसं एकत्र येण्यासाठी अशी स्मरणिका आणि अशा समारंभाची गरज आहे.’’ स्मरणिकेचे संपादन संस्थेचे अध्यक्ष नारायण खानोलकर, सचिन सामंत, डॉ. पूजा सामंत, योगेश सामंत यांनी केले आहे. सिया सामंत, डॉ. सामंत व नेरुरकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com