पोटगीची रक्कम न भरल्याने पतीला महिन्याचा साधा कारावास

पोटगीची रक्कम न भरल्याने
पतीला महिन्याचा साधा कारावास
Published on

पुणे, ता. २८ : पत्नीला दरमहा मंजूर झालेली अंतरिम पोटगी भरली नाही म्हणून न्यायालयाने पतीला एक महिन्याचा साधा कारावास सुनावला आहे. पतीने पोटगीचे १४ लाख रुपये थकविले आहेत. ती रक्कम भरण्यास पतीने नकार दिल्याने प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी व्ही. एस. खंदारे यांनी ही शिक्षा सुनावली.
पतीने पोटगीचे किमान एक लाख ६२ हजार रुपये भरले तरच त्याची सुटका केली जाईल, असेही आदेशात नमूद केले आहे. पोटगीची रक्कम न दिल्याने पत्नीची आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे तिने प्रलंबित पोटगीसाठी न्यायालयात अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने पतीविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर पोलिसांनी पतीला न्यायालयात हजर केले होते. मात्र त्याने पोटगी भरण्यास नकार दिला. ॲड. जयपाल पाटील आणि ॲड सुखदेव सानप यांनी न्यायालयात पत्नीची बाजू मांडली.
रमेश व रसिका (नावे बदललेली) यांचे लग्न १७ जानेवारी २०१३ मध्ये झाले. त्यांना एक मुलगी आहे. माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून रमेश पत्नीला कायम टोचून बोलायचा. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करण्याबरोबरच तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. त्यामुळे रसिका रमेशपासून वेगळी राहू लागली. त्यानंतर रसिकाने कौटुंबिक हिंसाचारांतर्गत न्यायालयात अर्ज दाखल करून पोटगीची मागणी केली. २०२२ मध्ये न्यायालयाने पत्नीला २७ हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर केली. मात्र रमेश यांनी पोटगी दिली नाही. ही पोटगीची थकीत रक्कम १४ लाखांच्या घरात पोहचली. त्यामुळे पत्नीने थकीत पोटगीची रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने पतीला समन्स पाठविले. त्यालाही प्रतिसाद न दिल्याने पतीविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com