रुग्ण हक्क परिषदेतर्फे 
‘आरोग्य साहित्य संमेलन’

रुग्ण हक्क परिषदेतर्फे ‘आरोग्य साहित्य संमेलन’

Published on

पुणे, ता. १० : रुग्ण हक्क परिषदेतर्फे पहिले ‘आरोग्य साहित्य संमेलन’ १९ ऑक्टोबरला आयोजित केले आहे. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या संमेलनाचे उद्‍घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. या संमेलनात डॉ. स्मिता आणि डॉ. रवींद्र कोल्हे यांना ‘महाराष्ट्र आरोग्य भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष उमेश चव्हाण, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी शुक्रवारी (ता. १०) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. मिलिंद भोई, मिलिंद गायकवाड, राजेंद्र कदम, आशिष गांधी आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘‘या संमेलनानिमित्त पुणे आरोग्य महोत्सवाचेही आयोजन केले आहे. नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,’’ असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com