ढोले पाटील एज्युकेशनतर्फे वार्षिक समारंभ

ढोले पाटील एज्युकेशनतर्फे वार्षिक समारंभ
Published on

पुणे, ता. २८ : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे आयोजित केलेला ‘क्षितिज २०२५’ वार्षिक समारंभ उत्साहात झाला. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी विविध खेळ, एकांकिका, काव्य वाचन आदी उपक्रम सादर केले. तसेच लुक-अलाइक डे, वादविवाद, पथनाट्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले. याशिवाय कला प्रदर्शन, हॅलोवीन डे सेलिब्रेशन आणि फन फेअरमध्येही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. फॅशन शो आणि डीजे नाइटसह समारंभाची सांगता झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुप्रिया शेळके, प्रा. भूषण करमकर, प्रा. मनीषा काकडे, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश राजनकर आणि डॉ. अभिजित दंडवते यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com