अवती भवती

अवती भवती

Published on

जेथे महाविद्यालयात
अर्थव्यवस्थेवर व्याख्यान
पुणे, ता. ४ : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या समाजभूषण बाबूराव ऊर्फ अप्पासाहेब जेथे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग अंतर्गत ‘भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी अर्थतज्ज्ञ प्रा. अभय टिळक, डॉ. दीपाली पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एल. जी. रेटवडे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. अशोक मोजाड आदी उपस्थित होते. प्रा. टिळक यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीचे चित्र स्पष्ट करताना महागाई, रचनात्मक बेकारी, शेती क्षेत्राची अवस्था या विषयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्राच्या विविध संकल्पनेवर तयार केलेल्या पोस्टरचे प्रदर्शन आयोजित केले होते. सूत्रसंचालन प्रा. दिलीप पवार यांनी केले. डॉ. संतोष यादव यांनी आभार मानले.
..........
यशस्वी सोसायटीचे
वार्षिक स्नेहसंमेलन
पुणे, ता. ४ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’चे ‘क्रिसेंडो’ हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आयआयएमएस’चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. त्यानंतर संस्थेतर्फे घेण्यात विविध कला, क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन व सांगीतिक कलाविष्कार सादर केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. वंदना मोहंती, अश्विनी ब्रह्मे, प्रा. गंगाधर डुकरे, युगंधरा पाटील, विद्या उगरे आणि करिष्मा कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले.
............
नेत्र, लॅसिक तपासणी
शिबिर शनिवारी
पुणे, ता. ४ : ‘जागतिक महिला दिना’निमित्त रोटरी क्लब ऑफ पूना डाउनटाउन आणि वाघ नेत्रालय यांच्या सहकार्याने शनिवारी (ता. ८) मोफत नेत्र आणि लॅसिक तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर घोले रस्ता येथील वाघ आय क्लिनिक येथे सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत होईल. शिबिराचे उद्‍घाटन माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सुजाता शिरोळे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती वाघ नेत्रालयाच्या संगीता वाघ व डॉ. झिमरा इस्राईल यांनी दिली.
..........
प्रत्येक डेपोत सुरक्षारक्षक
नेमण्याची मागणी
पुणे, ता. ४ : शहरात ‘पीएमपी’ बसेसचे डेपो सर्वत्र आहेत. मात्र, या डेपोतील बसेस रात्रीच्या वेळेस सार्वजनिक रस्त्यावर उभ्या केलेल्या असतात. तिथे रात्रीच्यावेळेस फिरस्ते, बेघर आणि मद्यपी दिसून येतात. त्यामुळे या बसेसमध्येही स्वारगेट शिवशाहीसारखा गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रत्येक डेपोत सुरक्षारक्षक नेमून डेपोमध्ये बस उभे करावे,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर उपाध्यक्ष बाळासाहेब अटल यांनी निवेदनाद्वारे ‘पीएमपी’ प्रशासनाला केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com