

पुणे, ता. ४ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार पेठेतील दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे शिबिरात जवळपास ९०० रुग्णांची नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
लायन्स क्लब ऑफ पुणे, एच. व्ही. देसाई नेत्रालय हडपसर यांच्यावतीने आयोजित शिबिरात काही रुग्णांची नेत्रतपासणी आणि चष्मे वाटप, तर १०३ रुग्णांच्या नेत्र आजारावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले की, शिबिरात मोफत नेत्रतपासणी, चष्मे वाटप, ‘आय ड्रॉप्स’ वाटप, मोफत मोतीबिंदू, काचबिंदू, पडद्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. हे कार्य सातत्याने सुरू असून, गरजूंनी ट्रस्टच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.