

पुणे, ता. ४ : पार्टटाइम जॉबद्वारे ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास जादा पैसे मिळतील, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी विमाननगरमधील एका महिलेची ३१ लाख रुपयांची फसवणूक केली.
याबाबत एका महिलेने (वय ३२, रा. साकोरेनगर, विमाननगर) विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १७ ते १९ जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. अज्ञात व्यक्तीने महिलेला मोबाईलवर संपर्क साधला. पार्टटाइम जॉबमध्ये ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगले पैसे कमावता येतील, असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून महिलेने त्या अज्ञात व्यक्तीच्या बॅंक खात्यात ३१ लाख ६५ हजार रुपये ऑनलाइन जमा केले; परंतु कोणताही परतावा न मिळाल्याने महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे करीत आहेत.
पीएमपी बसमधील महिलेचे दागिने चोरीस
पुणे, ता. ४ : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना दोन मार्च रोजी स्वारगेट बसस्थानक ते विश्रांतवाडीदरम्यान घडली. याप्रकरणी दिघी येथील ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्याने बसमध्ये गर्दीचा फायदा घेत महिलेचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड करीत आहेत.
कोंढव्यात दुचाकीच्या डिकीतून रोकड लंपास
पुणे, ता. ४ : पार्किंगमधील दुचाकीच्या डिकीतून चोरट्याने एक लाखाची रोकड चोरी केली. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोंढवा परिसरातील ब्रह्मा इस्टेट इमारतीसमोर घडली. या प्रकरणी वसीम तौफीक खान (वय ४७, रा. घोरपडी गाव) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हसीना शेख करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.