बाल कल्याण समिती २ला
‘बाल स्नेही’ पुरस्कार

बाल कल्याण समिती २ला ‘बाल स्नेही’ पुरस्कार

Published on

पुणे, ता. ४ ः महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ‘बाल स्नेही’ पुरस्कार २०२४ यंदा पुणे विभागातून बाल कल्याण समिती क्रमांक २ यांना मुंबईमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व मंत्री पियुष भोयर यांच्या उपस्थितीत नुकताच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी मनिषा बिरासीस यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बाल कल्याण समिती क्रमांक २च्या अध्यक्षा नंदिता अंबिके, सदस्य ॲड. परेश खाडिलकर, संध्या गायकवाड, सारिका अगज्ञान व अर्चना राऊत यांनी पुरस्काराचा स्वीकार केला. ‘बाल स्नेही’ पुरस्कार हा बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर दिला जाणारा पुरस्कार असून, हा पुरस्कार जिल्हा बाल संरक्षण कक्षाला व बाल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो.
बाल कल्याण समिती क्रमांक २ने गेल्या तीन वर्षात ७ हजारपेक्षा जास्त प्रकरणे निकाली काढली आहेत. जिल्ह्यातील ५०पेक्षा अधिक बालगृह, शिशुगृह, ग्रामीण अंतर्गत असलेली सर्व पोलिस ठाणी, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत येणारी सर्व पोलिस ठाणी ही समिती २च्या कार्यक्षेत्रात आहेत. समितीने बालसंरक्षण, निराधार बालकांचे पुनर्वसन, बालविवाह, बालकामगार, बालभिक्षेकरी, लैंगिक अत्याचाराने पीडित अल्पवयीन बालके यांची सुरक्षितता, पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वासाच्या दिशेने प्रभावी उपक्रम राबवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com