

अहिल्यानगर, ता. ३ : ‘सकाळ माध्यम समूह’, अहिल्यानगर महानगरपालिका आणि प्रेरणा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २४ मार्चदरम्यान ‘सकाळ पुस्तक महोत्सव-अहिल्यानगर २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यातील सर्व प्रमुख प्रकाशक, प्रसिद्ध पुस्तकविक्रेते, तसेच क्रॉसवर्डसारखे आघाडीचे पुस्तकविक्रेतेही सहभागी झाले आहेत.
या महोत्सवासाठी ‘सकाळ’तर्फे भव्य प्रदर्शन आणि साहित्यिक मंच उभारण्यात येणार आहे. सहभागी प्रकाशक, पुस्तकविक्रेते आणि वाचकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.
अहिल्यानगरमधील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी अनेक संस्थांनी नियोजन केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने पुस्तक खरेदी करावे, यासाठी पालकांना माहिती दिली जात आहे. अशा पद्धतीचा पुस्तक महोत्सव पहिल्यांदाच होत असल्याने नगरकरांमध्ये उत्सुकता आहे.
स्टॉलच्या नोंदणीची संधी
या महोत्सवासाठी अद्याप स्टॉलची नोंदणी न केलेल्या प्रकाशक व पुस्तकविक्रेत्यांसाठी ही अंतिम संधी आहे. त्या व्यतिरिक्त शैक्षणिक खेळणी, स्टेशनरी उत्पादक व वितरक, शैक्षणिक आणि कौशल्य विकास संस्था सहभागी होऊ शकतात.
माहितीसाठी संपर्क : ९१४६०३८०२७/ ८८८८८४९०५०
नोंदणीसाठी ई- मेल : sakalpraksahan@esakal.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.