अवती भवती

अवती भवती
Published on

अत्याचार प्रकरणाची डॉ. गोऱ्हेंकडून दखल
पुणे, ता. ४ : पुणे जिल्ह्यातील खेड पोलिस ठाण्याच्या ह‌द्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाची विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने दखल घेत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

गौरी धुमाळ यांना ‘गुणश्रेष्ठता’ पुरस्कार
पुणे, ता. ४ : रोटरी क्लब ऑफ पूना वेस्टतर्फे स्वामी निवास वृद्धाश्रमाच्या विश्वस्त गौरी धुमाळ यांना ‘व्यावसायिक गुणश्रेष्ठता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण क्लबचे माजी अध्यक्ष अशोक कोठारी व डॉ. राजीव देशमुख यांच्या हस्ते झाले. धुमाळ यांनी वृद्धांच्या सेवेचे हे व्रत सामाजिक ऋण म्हणून स्वीकारत पौड गावाजवळ वृद्धाश्रम सुरू केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com