महापालिका अर्थसंकल्प ़ विभाग

महापालिका अर्थसंकल्प ़ विभाग

Published on

महापालिका अर्थसंकल्प

पाणी पुरवठा विभाग
- समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ७९ पाणी साठवण टाक्‍या यावर्षी होणार कार्यान्वित
- ३०० किलोमीटर लांबीच्या नवीन वितरण व्यवस्था होणार विकसित
- पाणी पुरवठ्यासाठीचे १४१ परिमंडळ पुढील वर्षीपर्यंत कार्यान्वित होणार
- बावधन बुद्रुकमध्ये ५ पाण्याच्या टाक्‍यांचे व ३५ किलोमीटर जलवाहिनीचे काम केले जाणार
- सुस-म्हाळुंगेसाठी ६ पाण्याच्या टाक्‍यांचे बांधकाम व ७७ किलोमीटर जलवाहिन्या होणार विकसित
- वाघोली येथेही पाण्याच्या टाक्‍या व जलवाहिन्या तयार केल्या जाणार

मलनिस्सारण
- मलवाहिन्या, गेट बदलणे व अन्य कामांसाठी ३७८ कोटी रुपयांची तरतूद
- ६०किलोमीटर व्यासाच्या मलवाहिन्या टाकण्यात येणार
- मलवाहिन्या देखभाल दुरुस्ती, नाले सफाई, पावसाळी वाहिन्यांची सफाईसाठी ७७ कोटी ५० लाखांची तरतूद
- पावसाळी पाणी साचणारी ठिकाणे व नाल्यालगत सीमाभिंतीसाठी २२ कोटी ५० लाखांची तरतूद
- मलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद

घनकचरा व्यवस्थापन
- ओला कचरा प्रकल्पातून कचऱ्यापासून ब्रिकेटस्‌ बनविण्याचा प्रकल्प होणार कार्यान्वित
- कचरा केंद्रांवरील रॅम्पचे आधुनिकीकरण होणार
- रामटेकडी येथे कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती होणार, ३५० टनाचा क्षमतेचा प्रकल्प होणार सुरू
- प्रतिदिन २५ टन क्षमतेचा चिकन-मटण कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार
- शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांवर होणार ‘स्मार्ट टॉयलेट-बाथरूम
- बायोएनर्जी प्रकल्पातून १३.९० मेगावॉट वीजनिर्मिती होणार

पथ विभाग
- महापालिकेकडून ३३ मिसिंग लिंकचे काम पूर्ण होणार
- मिसिंग लिंकद्वारे मध्यवर्ती वर्तुळाकार मार्ग उपलब्ध करून दिला जाणार
- शहरातील सर्व रस्त्यांचे ‘रोड ऍसेस मॅनेजमेंट सिस्टिम’ (रॅम्पस्‌) करणार तांत्रिक विश्‍लेषण
- ३३ आदर्श रस्त्यांअंतर्गत उर्वरित १८ रस्त्यांचे काम दुसऱ्या टप्प्यात केले जाणार
- पीपीपी तत्वावर ३६ रस्ते व पूल विकसित करण्यास प्राधान्य
- स्कूल ट्रॅव्हल इंप्रूव्हमेंट प्लॅनअंतर्गत ९ शाळांच्या ठिकाणी ‘सुरक्षित विद्यार्थी प्रवास प्रकल्प’

उद्यान
- सर्पोद्यान प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
- कॉमन व जॉफरी मॉरमोसेट, कॉटन टॉपटॅमरीन, गोल्डन हॅडेड टॅमरीन प्राणी येणार
- वन्यजीव संवर्धन शिक्षण व प्रबोधन प्रकल्प कार्यान्वित होणार
- जागतिक स्तरावरील बर्ड पार्कचा पहिला टप्पा सुरू होणार
- राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील प्रकल्पाच्या कामासाठी ४८ कोटींचा येणार खर्च

शिक्षण
- महापालिकेच्या १५० शाळांमध्ये यांत्रिकीपद्धतीने सफाईसाठी १४ कोटी रुपयांची तरतूद
- १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अभिनव शाळा तयार केल्या जाणार
- २६५ प्राथमिक शाळा व नवीन शाळांमधील ई-लर्निंग प्रकल्प देखभाल दुरुस्ती, ई-लर्निंग संच बसविले जाणार
- विशेष मुलांच्या शाळेसाठी विविध उपक्रमांसाठी भरीव तरतूद
- ७०० शिक्षकांच्या वेतनासाठी भरीव तरतूद
- समाविष्ट गावांमधील ६५ शाळांमध्ये सुविधा दिल्या जाणार

विद्युत

- नवीन विकास आराखड्यातील रस्ते व मिसिंग लिंकवर प्रकाश व्यवस्थेसाठी तरतूद
- महत्त्वाचे रस्ते व समाविष्ट गावातील रस्त्यांवरील प्रकाश व्यवस्थेसाठी भरीव तरतूद
- महापालिकेच्या इमारती,वाहनतळ, संग्रहालये, शाळांमधील सुरक्षिततेसाठी अग्निशामक यंत्रणा बसविणार
- दवाखाने, रुग्णालयांच्या फायर ऑडीटनंतर विद्युत विषयक कामे केली जाणार
- दवाखान्यांसाठी विद्युत उपकरणे व देखभाल दुरुस्ती
- महापालिकेच्या वाहनतळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे
-------------
आरोग्य
- वैद्यकीय महाविद्यालयाच्या तृतीय वर्षासाठी आवश्‍यक यंत्रसामग्री खरेदी
- नायडू कॅम्पसमध्ये १४ मजली विद्यार्थी वसतिगृह व कर्मचारी सदनिकेचे बांधकाम सुरु होणार
- वैद्यकीय महाविद्यालयास आवश्‍यक शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया होणार
------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com