चारित्र्यहनन करणाऱ्या वक्तव्यांना लगाम घालण्याच्या अर्जावर आज आदेश

चारित्र्यहनन करणाऱ्या वक्तव्यांना लगाम घालण्याच्या अर्जावर आज आदेश
Published on

पुणे, ता. ४ : स्वारगेट बस स्थानकात झालेल्या अत्याचार प्रकरणातील तरुणीचे चारित्र्यहनन होर्इल, अशा पोस्ट समाजमाध्यमांवर टाकणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी मनाई आदेश (रिस्ट्रेनिंग ऑर्डर) काढावा, अशी मागणी तरुणीच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयात केली आहे. सरकारी वकिलांनीही तरुणीच्या वकिलांच्या केलेल्या अर्जाला पाठिंबा दिला असून, उद्या (ता. ५) त्यावर न्यायालयाकडून आदेश दिला जाणार आहे.

आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय ३६) याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. त्यानंतर काही नागरिकांनी तरुणीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने केली होती. समाजमाध्यमातूनही तरुणीवरच आरोप केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर तरुणीचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी न्यायालयात धाव घेत, तरुणीचे चारित्र्यहनन रोखण्यासाठी मनाई आदेश देण्याची मागणी केली आहे. या अर्जावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांच्या न्यायालयात मंगळवारी युक्तिवाद झाला. ही घटना सहमतीने झाली असल्याचा बचाव पक्षाचा दावा खोटा आहे, असे अॅड. सरोदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com