अवती भवती

अवती भवती
Published on

आरोग्य शिबिरात ३०० जणांची तपासणी
पुणे, ता. २८ : महर्षी वेदोद्धारक फाउंडेशनच्या वतीने नुकतेच मावळमध्ये मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांनी वहानगाव-मावळमधील ३०० नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधांचे मोफत वाटप केले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पांडुरंग बलकवडे यांचा सन्मान
पुणे, ता. २८ : धनलक्ष्मी प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब अमराळे यांच्या हस्ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे यांना जिरेटोप व कवड्यांची माळ स्वरूपातील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिवकालीन शस्त्रास्त्रांचे संग्राहक अभिजित धोत्रे व नाणी संग्राहक अभिजित भुजबळ यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बलकवडे यांनी इतिहासाची शौर्यगाथा या विषयावर मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ अमराळे, पेशवाई क्रिएशनचे संचालक राहुल येमूल, अतुल तासकर, अमराळे ज्वेलर्सचे संचालक स्वप्नील अमराळे, शीतल अमराळे, अमर हिंगमिरे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com