ज्येष्ठांच्या आरोग्यसुरक्षेसाठी रविवारपासून हाडसंपन्न सप्ताह
पुणे, ता. ४ : राष्ट्रीय अस्थिरोग दिनानिमित्त भारतीय अस्थिरोग संघटनेतर्फे (आयओए) रविवारपासून (ता. १०) ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेसाठी विविध उपक्रमांनी भरलेला ‘हाडसंपन्न सप्ताह’ चे आयोजन केले आहे.
या सप्ताहासाठी यावर्षीची थिम ही ‘ओल्ड इज गोल्ड - ३६० डिग्री केर फॉर एल्डरली, एन्स्युरिंग मोबिलिटी, डिग्निटी अँड लॉन्जेव्हिटी
(हालचालीक्षमता, स्वाभिमान आणि दीर्घायुष्य सुनिश्चित करणे)
‘आयओए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित शिंदे आणि डॉ. अनुप अग्रवाल यांची ही संकल्पना आहे. यानिमित्त शिबिरात देशभर विविध आरोग्यवर्धक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातील. यात मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरे, ऑस्टिओपोरोसिस आणि आर्थरायटिसचे निदान, आहार व योगसत्रे, घसरून अपघात टाळण्यासाठी मार्गदर्शन, तसेच जागरूकता व्याख्याने यांचा समावेश आहे. वृद्धाश्रमांना भेटी, औषधे वितरण, स्नेहसंवाद आणि आरोग्यदायी ज्येष्ठांचा सन्मान हादेखील महत्त्वाचे उपक्रम असतील. तरुण पिढीसाठी शालेय व महाविद्यालयीन जनजागृती कार्यक्रमांद्वारे हाडे-सांधे मजबूत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. महाराष्ट्र अस्थिरोग संघटना हे उपक्रम राज्यभर प्रभावीपणे राबवणार आहे. प्रदेशाध्यक्ष डॉ. डुमरे पाटील, सचिव डॉ. अभिजित वाहेगावकर आणि कार्यक्रम प्रमुख डॉ. प्रकाश सिगेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे आयोजन केले जाईल.
कार्यक्रमांचा उद्देश हा हाडे व सांधे यांच्या समस्यांकडे समाजाचे लक्ष वेधणे, ज्येष्ठ नागरिकांना समर्पित आरोग्यसेवा आणि सन्मान देणे, सामाजिक स्वास्थ्य, नैतिक जबाबदारी आणि डॉक्टरांची समाजाशी बांधिलकी अधोरेखित करणे व वृद्धत्व हे भार नसून अनुभवसंपन्न संपत्ती आहे याचा प्रसार करणे हे आहे.
‘‘ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य टिकवणे ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर सामाजिक बांधिलकी आहे. हे सप्ताहव्यापी उपक्रम निश्चितच समाजाला हाडांच्या आणि माणुसकीच्या आधाराने अधिक बळकट करतील.
डॉ. अभिजित वाहेगावकर, सचिव, महाराष्ट्र अस्थिरोग संघटना
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.