

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १२ ः राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या ‘शिवशाही’ बसने प्रत्येकी किमान ९ लाख किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. कागदोपत्री जरी ‘शिवशाही’चे आयुर्मान १५ वर्षे झाले असले तरीही प्रत्यक्षात मात्र ‘शिवशाही’ आता थकली आहे. बसची देखभाल-दुरुस्ती नावालाच सुरू आहे. कार्यशाळेतून बस बाहेर पडल्यावर कधी बंद पडेल, याचा नेम नाही. प्रवासात बस बंद पडणे हे तर नित्याचेच झाले आहे. ‘शिवशाही’चे हाल अन् प्रवासी बेहाल, अशी सद्यःस्थिती आहे.
प्रशासनाला दोष अमान्य
राज्य परिवहन महामंडळाने अन्य बसप्रमाणे ‘शिवशाही’ बसचे देखभाल-दुरुस्तीचे नियोजन केले आहे. कागदावर व प्रत्यक्षात बसची देखभाल होत असली तरीही बस बंद पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. बसच्या दरवाजापासून ते बसच्या बॉडीपर्यंतच्या विविध भागांत यांत्रिक दोष आहेत. हा दोष एसटी प्रशासन मान्य करीत नाही. मात्र त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
उघड्या दरवाज्यांनी घटवला वेग
प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी-उतरण्यासाठी असलेला दरवाजा हवेच्या दबावावर काम करतो. हवेचा दबाव कमी झाला की ‘शिवशाही’चे दरवाजे आपसुकच उघडतात. बस धावत असतानादेखील दरवाजामध्ये बिघाड असल्याने तो खुलाच राहत असल्याच्या काही घटना घडल्या आहेत. स्वारगेट बस स्थानकातील एका शिवशाही बसचा दरवाजा बंद होत नाही म्हणून तो दोरीने बांधला होता. दरवाजा उघडा राहिल्यावर एसीचे कुलिंग कमी होते, तर याचा परिणाम गाडीचा वेग कमी होण्यावरदेखील होतो. गाडीचा वेग कमी झाल्याने प्रवासाला तर विलंब होतोच; शिवाय इंधनाचा वापरदेखील वाढतो.
बस बंद पडण्याचे प्रमाण २० टक्के
पुण्याहून शिवशाही बस ही कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बारामती, मुंबई अशा महत्त्वाच्या मार्गांवर धावते. एसटीचे हे महत्त्वाचे मार्ग म्हणून ओळखले जातात. या मार्गांवर प्रवाशांची संख्या जास्त असल्याने शिवशाहीतून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. मात्र शिवशाहीचे खर्चाचे प्रमाणदेखील अधिक आहे. लालपरीच्या तुलनेत शिवशाही बस बंद पडण्याचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे.
देखभाल, दुरुस्तीबाबत ‘एसटी’चे म्हणणे
- दररोज स्टेरिंग व ब्रेकची पाहणी, ऑइलचा वापर
- दर दहा दिवसांनी ग्रीसिंगचा वापर केला जातो
- दर तीन महिन्यांनी चाक काढले जाते, बसचे उर्वरित पार्ट काढून तपासणी केली जाते, आवश्यक ती दुरुस्ती केली जाते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.