वीज दरवाढीला शीतगृह उद्योगाकडून विरोध

वीज दरवाढीला शीतगृह उद्योगाकडून विरोध

Published on

पुणे, ता. १० ः महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे शीतगृह उद्योगासाठी वीजदरवाढीचा ‘महावितरण’ने दिलेला प्रस्ताव हा अन्यायकारक असून परिणामी यामुळे शीतगृह उद्योग डबघाईला येणार असल्याची भावना ‘महाराष्ट्र कोल्ड स्टोअरेज असोसिएशन’ संघटनेने सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
‘महावितरण’ने प्रस्तावित केलेला १०.८१ रुपये प्रतियुनिट हा नवीन दर उद्योगाला परवडणारा नसून त्याची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजकिशोर केंढे यांनी केली. प्रस्तावित वीजदर हे औद्योगिक वीजदरांपेक्षा जास्त असल्याने संपूर्ण शीतगृह उद्योग संकटात सापडला आहे. २०१० मध्ये महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने शीतगृहांसाठी कृषी वीजदर लागू करण्याचा आदेश दिला होता. मात्र २०१६ मध्ये ‘कृषी-इतर’ नावाने नवीन प्रवर्ग निर्माण करून शीतगृहांसाठी वीजदर मोठी वाढ केली. २०२३ मध्ये आयोगाने आणखी एक दरवाढ करत शीतगृहांचे दर ७.८७ रुपये प्रतियुनिट केले असून ते औद्योगिक दरांच्या जवळपास समान दर आहेत, असे त्यांनी सांगितले.
केंढे म्हणाले, ‘‘शीतगृह हा एक भांडवली व खर्चिक उद्योग असून परतावा मिळण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे बहुउद्देशीय शीतगृह उभारणे राष्ट्रीय हिताचे ठरेल, जेथे विविध अन्नपदार्थ तसेच शेतकऱ्यांकडून शेतीमाल साठवता येतील. परंतु, वाढत्या वीजदरामुळे हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. शीतगृह उद्योग टिकविण्यासाठी राज्य सरकारकडून मदतीची गरज आहे.’’ या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र कोल्ड स्टोअरेज असोसिएशनचे पुरुषोत्तम नावंदर, तुषार पारख, बिपिन रेवणकर, आदित्य झुनझुनवाला, प्रतीक मेहता, अनिल कोरपे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com