मिळकतकर वसुलीत नगर रस्ता अव्वल
पुणे, ता. १० : पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. नियमीत करासह जास्तीत जास्त थकबाकी वसुली करून हा पैसा विकासासाठी वापरला जातो. २०२४-२५ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत २२१० कोटी रुपये मिळकतकर जमा झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ३३३.६५ कोटी रुपयांची वसुली नगर रस्ता वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून झाली आहे. तर सर्वांत कमी ४३.६८ कोटी रुपयांची कर वसुली भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून झाली आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहराच्या विविध भागातील विकास कामांसाठी तरतूद केली जाते. काही भागांत नवीन रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपुलासाठी तरतूद केली जाते तर काही भागांत पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिनी, पावसाळी वाहिन्या टाकण्यासाठी तरतूद केलेली असते. शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांमधून कर वसुली जास्त होत आहे, त्याचप्रमाणात अर्थसंकल्पात उपनगरांमधील कामांसाठी खर्चाची तरतूद जास्त केलेली दिसून येते. पुणे शहरात समाविष्ट गावांसह जुन्या हद्दीत १४ लाख मिळकती आहेत. पण त्यातील थकबाकीदारांची संख्याही लाखोमध्ये आहे. नियमीत कर भरणाऱ्यांची संख्या नऊ लाख इतकी आहे. या मिळकतधारकांकडून मार्च महिन्यात २२१० कोटी रुपये कर जमा झाला आहे.
हडपसर-मुंढव्यात सर्वाधिक मिळकती
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक जास्त मिळकती हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. या भागात एक लाख १६,६०७ मिळकती, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक लाख दोन हजार ७८२ मिळकती तर नगररस्ता वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत एक लाख ९१२ मिळकती आहेत.
क्षेत्रीय कार्यालय मिळकती संख्या - वसुल रक्कम (रक्कम कोटी रुपयांमध्ये)
औंध बाणेर - ८७,९१६ - २७३.४६
भवानी पेठ - २९९२१ - ४३.६८
बिबवेवाडी - ३८२२२ - ६८.१०
धनकवडी-सहकारनगर-१,०२,७८२ - १६४.२९
ढोले पाटील - २११६५ - ७७.८८
हडपसर- मुंढवा - ११६६०९ -३२४.५६
कसबा पेठ-विश्रामबाग - ४३४३६ - ५६.८४
कोथरूड-बावधन - ८९३१५ - १७२.३८
नगररस्ता-वडगावशेरी - १००९१२ -३३३.६५
शिवाजीनगर-घोलेरस्ता - २४७९१ - ९२.१३
सिंहगड रस्ता - ८४०९६ -१२३.८३
वानवडी-रामटेकडी - ४०,३८९ - ७१.३९
वारजे-कर्वेनगर - ४८४०६ - ७८.४८
येरवडा-कळस-धानोरी- ५०३५६ - १३१.८३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

