

पुणे, ता. १० : वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इ. बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १५ ते २१ मार्चदरम्यान होणार आहे. घर वास्तुदोषमुक्त असावे ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
बोअरवेल भूजल पातळी मॉनिटरिंग
केंद्र सरकार अनुदानित भूजल अॅप हे कृषी मंत्रालयाने नावीन्यपूर्ण संशोधन म्हणून मान्य केलेले पेटन्टेड मोबाईल अॅप आहे. याद्वारे घरबसल्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी अवघ्या एका मिनिटात मोजता येते. या अॅपच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण १५ मार्चला आयोजिले आहे. प्रशिक्षणात भूजल अॅपच्या मदतीने बोअरवेल व्यवस्थापन, भूजल पातळी मॉनिटरिंग करण्याच्या अत्याधुनिक पद्धती, शाश्वत शेतीसाठी पाणी बचत आणि नियोजन, वीज आणि पाणी बचतीचे फायदे आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे. शेतकऱ्यांसाठी भूजल अॅप वापरण्याचे फायदे म्हणजे याद्वारे बोअरवेलचे योग्य व्यवस्थापन होते, पाण्याच्या उपलब्धतेनुसार अधिक फायदेशीर शेती करता येते व उन्हाळ्यात पिकांचे नुकसान टाळता येते, जनावरांसाठी व आपत्कालीन वापरासाठी पाणी राखून ठेवता येते, वीज बचत व शाश्वत जलसंधारण ही उद्दिष्टे साधता येतात.
संपर्क : ९१५६०१००६०, ८९५६७१२६३१
ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने
ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून व्यवसाय कसा वाढवायचा, खर्च किती, सेलर पोर्टल कसे हवे आदींबाबत प्रात्यकक्षिकासह मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १५ मार्चला आयोजिली आहे. यात उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, ऑफर कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७
महारेरा सक्षमता प्रमाणपत्र प्रशिक्षण
प्रशिक्षण व प्रमाणपत्र नसणाऱ्या रिअल इस्टेट एजंटवर कारवाई करत त्यांची नोंदणी रद्द करण्याचा आदेश महारेराने दिला आहे. महारेराने आता नवीन एजंट नोंदणी व नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नाही, त्यांची रेरा नोंदणी महारेराने रद्द केलेली आहे. नोंदणीकृत रेरा एजंट होण्यासाठी आता २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. ‘एसआयआयएलसी’तर्फे होणाऱ्या प्रशिक्षणाची ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १७ मार्चपासून सुरु होत आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.