‘सीओईपी’त रंगणार
जलक्रिडेचा थरार

‘सीओईपी’त रंगणार जलक्रिडेचा थरार

Published on

पुणे, ता. १० : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या बोट क्लबतर्फे ९७ वा रेगाटा उत्सव शनिवार (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) आयोजित करण्यात आला आहे. ‘क्षितीजाच्या पलीकडे नौकानयन’ हे यंदाच्या उत्सवाचे ब्रीदवाक्य आहे. कयाक बॅलेट, शेल गेम्स, पंट फॉर्मेशन, टेली मॅचेस आणि मशाल नृत्य हे चित्तथरारक जलक्रीडा हे या उत्साहाचे खास आकर्षण आहे. पाण्यात रंगणारा जलक्रिडेचा थरार म्हणून ‘रेगाटा’ उत्सवाकडे पाहिले जाते. सीओईपीतील शंभरहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होत आपला क्रिडा प्रकार सादर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com