परमहंस स्वामी स्वरूपानंद जीवनगौरव पुरस्काराचे २१ला वितरण

परमहंस स्वामी स्वरूपानंद जीवनगौरव पुरस्काराचे २१ला वितरण
Published on

पुणे, ता. १० : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘परमहंस स्वामी स्वरूपानंद जीवनगौरव पुरस्कार’ यंदा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांना जाहीर झाला असून, त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा २१ मार्च रोजी कर्वे रस्ता येथील स्वामिकृपा हॉल येथे होणार आहे. या वेळी ‘महाराष्ट्र टाइम्स, पुणे’चे संपादक श्रीधर लोणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. पुरस्कार सोहळ्यापूर्वी स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक अनिल स्वामी यांचे ‘संत नामदेवराय यांच्या पाऊलखुणांचा मागोवा (परभणी आणि हिंगोली जिल्हा)’ विषयावर व्याख्यान होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख डॉ. श्यामा घोणसे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com