

पुणे, ता. १० : भक्तिसुधा फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘ऊर्जा - सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरूडच्या बाल शिक्षण मंदिर येथे केले होते. शास्त्रीय बंदिशीद्वारे देवी सीतामाता, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, यमुनाबाई सावरकर अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या त्याग, तपस्या, भक्ती, शौर्य, मातृत्व, शक्ती अशा गुणांचा परिचय झाला. संगीतकार आशिष केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली गायिका पल्लवी पोटे, मृणाल भिडे, प्राजक्ता मराठे व श्रुती विश्वकर्मा-मराठे यांनी कार्यक्रम सादर केला. तबल्याची साथ सावनी तळवलकर व हार्मोनिअमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली. यावेळी गायिका निर्मला गोगटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुशील ओक, पंडित सुहास व्यास, विदुषी माधुरी डोंगरे, विदुषी मंजिरी कर्वे-आलेगावकर, डॉ. शुभांगी बहुलीकर, अपर्णा केळकर, शेखर कुंभोजकर, पं. विकास पुरंदरे उपस्थित होते. सूत्रसंचालन कीर्तनकार मानसी बडवे यांनी केले तर आदिती केसकर यांनी निवेदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.