नशेसाठी टर्मीन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

नशेसाठी टर्मीन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक
Published on

पुणे, ता. १० : नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या मॅफेंटरमाइन सल्फेट (टर्मीन) इंजेक्शनची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे टर्मीन इंजेक्शनच्या एक लाख रुपये किमतीच्या १९० बाटल्या जप्त केल्या आहेत.
योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. मोरेवस्ती, मांजरी बुद्रुक, हडपसर) आणि निसार चाँद शेख (वय २३, रा. घाडगे गल्ली, शेख चाळ, हडपसर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यावर इंजेक्शनची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार तपासपथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी, पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड, पोलिस अंमलदार दीपक कांबळे, अभिजित राऊत, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, महावीर लोंढे, चंद्रकांत रेजिवाड हडपसर परिसरात रविवारी (ता. ९) गस्तीवर होते. त्या वेळी त्यांना टर्मीन इंजेक्शनची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून १९० इंजेक्शनच्या बाटल्या जप्त केल्या असून नशा करण्यासाठी त्याची विक्री करण्यात येत होती.
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नीलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत.

इंजेक्शनमधील विषारी द्रव्यांमुळे दुष्परिणाम
मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे रक्तदाब वाढवण्यासाठी वापरले जाते. ते हृदयाची पंपिंग क्षमता वाढवून आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या अरुंद करून रक्तदाब वेगाने वाढवते. हे इंजेक्शन डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिले जाते. आरोपींकडे औषध विक्रीचा परवाना नसून त्याबाबत शिक्षण घेतलेले नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापर केल्यास या इंजेक्शनमधील विषारी द्रव्यांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com