धूलिवंदन अन् रंगपंचमीला करा नैसर्गिक रंगांची उधळण काळजी घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
पुणे, ता. १२ : धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या सणामुळे बाजारात अनेक प्रकारचे रंग उपलब्ध झाले आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे घातक रंगही आहेत. त्यामुळे त्वचा, केस आणि डोळ्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच चेहरा किंवा हाताला लागलेला कृत्रिम रंग साफ करताना पेट्रोल, रॉकेल किंवा टर्पेंटाईन लावल्याने त्वचेला इजा होण्याची भीती असते. त्यामुळे फक्त नैसर्गिक रंगाचा वापर करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या सणाला अनेकजण एकमेकांच्या चेहऱ्याला रंग लावून नात्यात गोडवा आणतात. मात्र घातक रंगांमुळे कोरडेपणा, ऍलर्जी, पुरळ यांसारख्या त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. याविषयी त्वचारोगतज्ज्ञ जेनीफर कोलते म्हणाल्या, ‘‘बाजारात रंगांचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण बहुतांश रंगांमध्ये रसायनांचा वापर केला जातो. ते स्वस्त आणि मजबूत असल्यामुळे अनेकजण त्यांचा वापर करतात. मात्र हे रंग केवळ तुमच्या त्वचेलाच नव्हे तर शरीराच्या अनेक भागांनाही हानी पोहोचवतात. याशिवाय मेटॅलिक पेस्टचाही भरपूर वापर केला जातो. त्यामुळे डोळ्यांना ॲलर्जी होण्याचा धोका असतो. हे हानिकारक परिणाम लक्षात घेऊन त्यांचा वापर नागरिकांनी टाळावा.’’
हानिकारक रंगांचे दुष्परिणाम
- त्वचेची ॲलर्जी
- डोक्याला खाज येणे
- डोळ्यांना इन्फेक्शन
- अस्थमा
अशी घ्या काळजी
- कृत्रिम रंगांचा वापर टाळा
- खोबरेल तेल लावून रंग खेळा
- सनस्क्रीन वापरा
- रंग काढण्यासाठी त्वचेला जास्त घासणे टाळा
- खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा
रंगात कधी तरी रांगोळी किंवा संगमरवराची पावडर मिसळतात. ही पावडर डोळ्यात गेल्यास गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकतो. तसेच रासायनिक रंग डोळ्यांत गेल्यास डोळे कोरडे होणे, डोळ्यांना ॲलर्जी होणे असा त्रास होण्याचा धोका असतो. या रसायनांमुळे डोळ्याच्या बुबुळाला इजा होऊ शकते. रंग डोळ्यांमध्ये जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. अश्विनी मिसाळ, नेत्ररोगतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

