आयएसएएस पुणे चॅप्टरचा बडोदा येथे तिहेरी गौरव
पुणे, ता. १२ : बडोदा येथे एम. एस. विद्यापिठात पार पडलेल्या ‘इंडियन ॲनालिटिकल सायन्स काँग्रेस’ मध्ये आयएसएएस पुणे चॅप्टरचा तिहेरी गौरव करण्यात आला. ही काँग्रेस ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲनालिटिकल सायंटिस्ट (ISAS)’यांच्या वतीने आयोजित केली होती. पुणे चॅप्टरच्या वर्षभरातील कामगिरीबद्दल त्यांना ‘बेस्ट चॅप्टर’ म्हणून आय.एस. ए. एस.चे अध्यक्ष डॉ. राघव सरण यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
दरम्यान, चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. निलीमा राजूरकर यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील संशोधनात दिलेल्या योगदानाबद्दल ‘बेस्ट वूमन सायंटिस्ट’ म्हणून महामहीम सन्माननीय राजमाता शुभांगीनी राजे गायकवाड, कुलपती एम. एस. युनिव्हर्सिटी, बडोदा व ISAS चे उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद युसूफ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या चॅप्टरच्या सहसचिव डॉ.अनुपा कुंभार यांचाही भरीव कार्याबद्दल ‘बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड’ देण्यात आले.
97336
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

