शिवछत्रपतींचा देदीप्यमान इतिहास उलगडणार

शिवछत्रपतींचा देदीप्यमान इतिहास उलगडणार
Published on

पुणे, ता. १२ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदीप्यमान इतिहास आणि हिंदवी स्वराज्याची गोष्ट जनसामान्यांसमोर गोष्टीरूपाने आणि अधिक रंजकपणे उभी करणाऱ्या ‘गोष्ट इथे संपत नाही- शिवचरित्र’ या उपक्रमाचे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने करण्यात आले आहे. याद्वारे शिवछत्रपतींच्या जीवनातील आठ महत्त्वाच्या अध्यायांवरील कार्यक्रम ५ ते २७ एप्रिलदरम्यान प्रत्येक शनिवार- रविवारी सकाळी ९.३० वाजता होतील. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात हे सर्व कार्यक्रम होणार असून ते सशुल्क आहेत.
आयटी क्षेत्रात काम करणारे सारंग भोईरकर व सारंग मांडके हे आठही कार्यक्रम सादर करणार आहेत. मराठ्यांच्या इतिहासातील एखादी घटना निवडत त्याचे प्रभावी सादरीकरण करीत ती प्रेक्षकांसमोर आणायची, असे याचे स्वरूप आहे. रावेतकर ग्रुप हे या कार्यक्रमाचे पॉवर्डबाय स्पॉन्सर असून व्हीटीपी रिॲलिटी हे असोसिएट स्पॉन्सर आहेत.
या कार्यक्रमाबद्दल मांडके म्हणाले, ‘‘सारंग भोईरकर आणि मी एकत्र येत छत्रपतींचा आणि मराठ्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजेल, उमजेल, भावेल अशा पद्धतीने पोहोचवायचा प्रामाणिक प्रयत्न करावा, या भावनेने ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाला छोटेखानी स्वरूपात सुरुवात केली होती. आज ‘सकाळ’सारखे माध्यम या कार्यक्रमाचा महोत्सव करत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आम्ही आजवर केलेल्या १३ प्रयोगांपैकी आठ प्रयोग या उपक्रमात असतील. हे आठही प्रयोग एकापाठोपाठ ऐकणे, हे इतिहासप्रेमी रसिकांसाठी पर्वणी ठरेल. या सर्व गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्याचे पुढील गोष्टीवर होणारे परिणाम ऐकणे रसिकांना नक्की आवडेल. आठ प्रयोग सादर करताना आम्ही काही नवीन कविता, छंद, चित्रांचा समावेश सादरीकरणामध्ये केला आहे.’’


कार्यक्रमांचे वेळापत्रक....
शनिवार (ता. ५ एप्रिल)- अफजलखानाचा वध
रविवार (ता. ६ एप्रिल)- पन्हाळा ते पावनखिंड
शनिवार (ता. १२ एप्रिल)- पुरंदरचा तह
रविवार (ता. १३ एप्रिल)- आग्र्याहून सुटका
शनिवार (ता. १९ एप्रिल)- मोहीम मांडली मोठी
रविवार (ता. २० एप्रिल)- शिवराज्याभिषेक
शनिवार (ता. २६ एप्रिल)- दक्षिण दिग्विजय
रविवार (ता. २७ एप्रिल)- लढाई मराठी अस्तित्वाची
(जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात वरील सर्व कार्यक्रम सकाळी ९.३० वा. होतील.)


तिकीटांबाबत...
- ‘गोष्ट इथे संपत नाही- शिवचरित्र’ हा उपक्रम सशुल्क असून यासाठी सीझन पास आणि प्रत्येक प्रयोगासाठी वैयक्तिक तिकिटे उपलब्ध आहेत.
- या उपक्रमाचा सीझन पास हा प्रत्येक व्यक्तीला तळमजल्यासाठी ३ हजार रुपये तर बाल्कनीसाठी २ हजार रुपये अशा प्रकारांत उपलब्ध आहे.
- प्रत्येक प्रयोगाचे वैयक्तिक तिकीट तळमजल्यासाठी ५०० रुपये आणि बाल्कनीसाठी ३२० रुपये इतके असेल.
- कार्यक्रमाची तिकीटविक्री ‘बुक माय शो’ आणि ‘तिकीट खिडकी’ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com