चव्हाण यांची जयंती
मुद्रणालयात साजरी

चव्हाण यांची जयंती मुद्रणालयात साजरी

Published on

पुणे, ता. १२ : यशवंतराव चव्हाण यांची ११२ वी जयंती महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयात विशेष कार्यक्रमात साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई व महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक अंकुश काकडे, ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई उपस्थित होते. काकडे म्हणाले, ‘‘यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे शिल्पकार होते. त्यांनी द्रष्टेपणाने राज्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजना आखून त्या नियोजनबद्ध पद्धतीने राबविल्या. शेती, सहकार, शिक्षण, पाणीपुरवठा, वीज, दळणवळण यांसारख्या सामान्यांच्या योजनांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यांनी राजकारण व्यक्तिसापेक्ष न ठेवता सार्वजनिक विचारांचा पाया रचून इतिहास घडवला.’’ देसाई म्हणाले, ‘‘या देशात राज्याचा कारभार करताना राजकारण कसे करावे व सार्वजनिक जीवनात नीतिमत्ता व प्रतिष्ठा कशी जपावी हा आदर्श चव्हाण यांनी घालून दिला आहे.’’ मुद्रणालयाचे व्यवस्थापक चंद्रशेखर सातपुते यांनी आभार मानले.
-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com