

पुणे, ता. १२ : अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘शिवांजली-२०२५’ हे बत्तीसाव्वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात झाले.
यावेळी प्रमुख पाहुण्या अभिनेत्री अभिज्ञा भावे, ‘एआयएसएसएमएस’चे सहसचिव सुरेश शिंदे, खजिनदार अजय पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अॅड. भगवानराव साळुंके, प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमणे आदी उपस्थित होते. यावेळी विविध पारितोषिकांचे वितरण भावे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी ‘शिवांजली-२०२५’साठी शुभेच्छा दिल्या.
भावे म्हणाल्या, ‘‘स्वतःच्या क्षमतेला ओळखा. तुमच्याकडे प्रचंड क्षमता असून प्रयत्नांच्या बळावर तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात नक्कीच यशस्वी होऊ शकता.’’
डॉ. बोरमणे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या उल्लेखनीय यशाचा आढावा घेतला. तसेच शैक्षणिक वारश्यासोबत सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या ‘शिवांजली’ या उपक्रमास निर्धार, अखंडता आणि आवडीने पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला. शिंदे यांनी तांत्रिक कौशल्यासोबत अभ्यासेतर उपक्रमांची विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत महत्त्वाची भूमिका असल्याचे अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.