योग्य आहारातूनच आजारांना प्रतिबंध : डॉ. प्रणिता अशोक

योग्य आहारातूनच आजारांना प्रतिबंध : डॉ. प्रणिता अशोक

Published on

पुणे, ता. १४ : ‘‘वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शारीरिक चाचण्या, संतुलित आहार आणि व्यायाम ही त्रिसूत्री अवलंबल्यास महिलांना निरोगी आयुष्य जगणे सहज शक्य आहे. आहाराचे योग्य व्यवस्थापन केल्यास वजन तर नियंत्रणात राहिलंच पण आजारांना प्रतिबंध ही घालणे शक्य होईल,’’ असे प्रतिपादन आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी केले.

आहारविषयक सामाजिक अभियानाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. प्रणिता यांचे ‘महिलांचे आरोग्य आणि आहार’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यानिमित्ताने वजन कमी करून विविध आजारांवर मात करणाऱ्या मोहिनी शुक्ला, स्मिता पाळंदे, नीलम जगताप, दीपाली शिंदे, प्रियांका खामकर, मृदुला मोडक, वैशाली वैद्य, ज्योती सूर्यवंशी, सुजाता शहा, माधुरी देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. प्रणिता म्हणाल्या की, ‘‘संपूर्ण कुटुंबाचा गाडा जिच्यावर अवलंबून असतो, अशा घरातील महिलेच्या आहाराकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. ती खरंच पोषणमूल्य असणारा आहार घेते का, तिच्या शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक रोज घेतले जातात का, याची विचारपूस कुटुंबातील इतर सदस्यांनी करायला हवी. महिलांनी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य शारीरिक तपासण्या करायला हव्यात. या प्रत्येक टप्प्यात आहारात योग्य ते बदल करायला हवेत. वजन कमी करण्यासाठी कोणतीही पावडर, शेक, गोळ्या औषधे घेण्याची गरज नाही तर, आहाराचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.

महिलांचा आहार कसा हवा 
- सकाळी न चुकता नाष्टा करावा
- संतुलित आहार असावा
- दिवसभरात एकतरी फळ खा
- प्रिझर्वेटिव्ह किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न टाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com