निरोगी आरोग्यासाठी देशी बियाणे महत्त्वपूर्ण
पुणे, ता. १२ः ‘‘ग्रामीण व बदलत्या शहरी जीवनशैली लक्षात घेता दुष्परिणामांना सामोरे जाण्याऐवजी देशी धान्य, फळे यांच्या वाणांचे जतन करून ते आहारामध्ये आणण्याची गरज आहे. परंपरागत देशी बी-बियाणे व वाण यांचे बदलत्या आधुनिक युगात निरोगी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत,’’ असे प्रतिपादन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी बुधवारी (ता. १२) केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) बँकेच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्ताने बँकेच्या महिला बचत गट विभागामार्फत बचत गटातील महिलांचा गौरव केला, याप्रसंगी त्या बोलत होत्या. बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोपेरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील १५ तालुक्यांतून ३० उत्कृष्ट बचत गटांना या वेळी गौरविण्यात आले. या वेळी निधी संकलन आणि भागीदारी, स्वयंशिक्षण संस्थेच्या संचालक डॉ. मंजूषा कदम यांचे ‘आरोग्यमयी स्त्री’ या विषयावरील व्याख्यान झाले, तसेच वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हेमा यादव यांनीही स्त्री प्रबोधनपर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ‘नाबार्ड’च्या सरव्यवस्थापक स्मृती भगत यांनीही स्त्रियांसाठी उपयुक्त शासकीय योजना यांची माहिती दिली. बँक आणि नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी खाद्य महोत्सवाच्या माहितीपटाचे अनावरण बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालिका पूजा बुट्टेपाटील, निर्मला जागडे, संचालक प्रवीण शिंदे, विकास नाना दांगट बँकेचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध देसाई उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

