

पुणे, ता. १२ ः विधान परिषदेत नाभिक समाजाचा एकही आमदार नसल्याने समाजाचे प्रश्न मांडता येत नाहीत. त्यामुळे भाजप-महायुतीने विधान परिषद निवडणुकीत नाभिक समाजाला संधी द्यावी, अशी मागणी सकल नाभिक समाजातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
नाभिक समाजाचे रामदास सूर्यवंशी, रमेश राऊत, दिनकर चौधरी, बाळकृष्ण भामरे आदी या वेळी उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीत नाभिक समाजाला संधी द्यावी, संत सेना केश शिल्पी मंडळासाठी अडीचशे कोटींची तरतूद करावी, मंडळावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांची तत्काळ नेमणूक करावी, प्रतापगडावर शूरवीर शिवाजी महाले यांचे स्मारक उभारावे, पुण्यातील शिवसृष्टीमध्ये शूरवीर शिवाजी महाले यांचे स्वतंत्र दालन उभारावे, अशा मागण्या करत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.