

पुणे, ता. १२ ः समाजातील वंचित घटकांना कायदेविषयक सेवा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवून देत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे रविवारी (ता. १६) सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात विधी सेवा आणि सरकारी योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात २४ सरकारी विभागांचे ७५ हून अधिक स्टॉल्स असून, १० हजार ९४० लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या अनुदानपत्रासह विविध सरकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. समाजातील सर्व घटकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन सचिव पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.