नियमबाह्य शुल्क आकारून फसवणुकीचा विद्यार्थ्यांचा आरोप

नियमबाह्य शुल्क आकारून फसवणुकीचा विद्यार्थ्यांचा आरोप
Published on

पुणे, ता. १२ ः गेल्या चार-पाच वर्षांत नियमबाह्यपद्धतीने विविध प्रकारचे शैक्षणिक शुल्क आकारत आयएलएस विधी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याद्वारे कॉलेजने कोट्यवधींचा नफा प्राप्त केल्याचा आरोप विद्यार्थी मयूर गरुड, कृष्णकांत साठे यांनी बुधवारी (ता. १२) पत्रकार परिषदेत केला. महाविद्यालयाने केलेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात धर्मादाय आयुक्त कार्यालय व उच्चशिक्षण विभागाकडे तक्रार करण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र हे आरोप आयएलएस विधी महाविद्यालयाने फेटाळून लावले आहेत.
ॲड. वेदांत कुलकर्णी, ॲड. शुभम शेलार आणि ॲड. प्रसाद कामठे या वेळी उपस्थित होते. आयएलएस विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या शुल्क वसुलीची प्रशासनाकडे तक्रार केली होती. परंतु महाविद्यालयाने नियमबाह्य शुल्क वसुली सुरूच ठेवली. त्यामुळे कायदेशीर लढाई सुरू केल्याचे विद्यार्थी गरुड याने सांगितले. महाविद्यालयात सुरू असलेल्या चुकीच्या कामांना विरोध करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच पोलिसांकडे आंदोलनासाठी परवानगी मागितली. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

गैरव्यवहाराबाबत पुरावे नाहीत ः पातूरकर
महाविद्यालयावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांबाबत आम्हाला कोणतीही कागदपत्रे अद्याप मिळालेली नाहीत. याबाबत काही विद्यार्थ्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार केल्याचे समजते. त्यामुळे धर्मादाय आयुक्तालयात दाखल व प्रलंबित असलेल्या प्रकरणावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परवानगी नसताना आंदोलन केल्यास व त्यात सहभागी झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवार्इ करू, असे पत्र पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. त्यामुळे आम्ही इतर विद्यार्थ्यांना त्यात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे, असे आयएलएस विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या दीपा पातूरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com