

पुणे, ता. १८ : रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउनतर्फे ‘ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट’ अंतर्गत पुण्यातील ताराचंद रुग्णालय येथे डोळ्यांच्या विविध आजारांवरील तपासणी व शस्त्रक्रियेसाठी लागणारी ५५ लाख रुपयाची अत्याधुनिक यंत्रसामग्री भेट देण्यात आली. ही यंत्रसामग्री बाह्यरुग्ण विभाग आणि शस्त्रक्रियागृहात उपयोगात आणली जाईल. त्यामुळे गरीब व सर्वसामान्य रुग्णांवर कमी खर्चात आधुनिक उपचार करता येणार आहेत.
या वेळी ‘रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट’ संतोष मराठे, ताराचंद रुग्णालयाचे गोपाल राठी, रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाउनचे अध्यक्ष अभिजित म्हसकर, सचिव भालचंद्र दरेकर, माजी अध्यक्ष मीनल अवचट, प्रकल्पाचे संचालक सचिन देशपांडे आदी उपस्थित होते.
मीनल अवचट यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. राठी यांनी दवाखाना कसा उभा राहिला, दानशूर लोकांनी कशी मदत केली, याबाबत माहिती दिली. म्हसकर यांनी रोटरी क्लबविषयी माहिती सांगितली. डॉ. चंद्रशेखर वलवणकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे, उपस्थितांचे आभार मानले. सुनील हिंगमिरे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.