पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात

पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात
Published on

पुणे, ता. १८ ः पिस्तूल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. दारूवाला पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अल्पवयीनाकडे पिस्तूल असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या समर्थ पोलिस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दारूवाला पूल परिसरात सापळा लावला. टिळक आयुर्वेद महाविद्यालयाजवळ असलेल्या नागझरी नाल्याजवळ अल्पवयीन थांबला होता. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे पिस्तूल सापडले. पिस्तुलासह दोन काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com