विनयभंग करणाऱ्यावर २४ तासांत दोषारोपपत्र

विनयभंग करणाऱ्यावर 
२४ तासांत दोषारोपपत्र
Published on

पुणे, ता. १८ : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या सराईत गुन्हेगारास वानवडी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून २४ तासांच्या आत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
राहुल संजय मिरेकर (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी परिसरातून एक तरुणी तिच्या होणाऱ्या पतीसमवेत रस्त्याने पायी निघाली होती. त्यावेळी आरोपी मिरेकरने तरुणीला अश्लील शिवीगाळ केली. तसेच, तिच्यासमेवत असलेल्या तरुणाला मारहाण केली. याबाबत तरुणीने १७ मार्चला वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डॉ. शिंदे यांनी विशेष पथक तयार करून या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. तसेच, तपास पूर्ण करून दुसऱ्याच दिवशी १८ मार्चला त्याच्यावर लष्कर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com