आज पुण्यात २३ ऑगस्ट २०२५ शनिवार
आज पुण्यात २३ ऑगस्ट २०२५ शनिवार
..........................................
सकाळी ः
बालगणेश कोथरूड फेस्टिव्हल ः संवाद, पुणे, वृद्धी रिॲलिटी व पुणे महापालिका, अस्तित्व फाउंडेशन आयोजित ः बालगणेश कोथरूड फेस्टिव्हल ः विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक शाडूमातीच्या श्रीगणेशाच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा ः उद्घाटन हस्ते- मुरली लाहोटी ः उपस्थिती- विजयकुमार थोरात, राजश्री जायभाये ः अध्यक्ष- अमोल शहा ः छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, ४७ मुलींची शाळा, शिवाजी पुतळ्याजवळ, कोथरूड ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः आडकर फाउंडेशनतर्फे ः बबनराव पाटील लिखित ‘विठ्ठलवारी आनंदयात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- डॉ. सदानंद मोरे ः उपस्थिती- विद्याधर अनास्कर ः ‘वारी पंढरीची’ या विषयावर कविसंमेलन ः सहभाग- प्रभा सोनवणे, स्वाती यादव, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, डॉ. मिलिंद शेंडे, विजय सातपुते, सुजित कदम, जयश्री श्रोत्रिय ः पत्रकार भवन, नवी पेठ ः ११.००.
पुस्तक प्रकाशन ः समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी प्रकाशन आयोजित ः ‘गगनभरारी’ (राजगड पर्व) पुस्तकाचे प्रकाशन ः अध्यक्ष- मेधाताई कुलकर्णी ः अध्यक्ष- प्रा. मेधा कुलकर्णी ः प्रमुख पाहुणे- अविनाश चाबुकस्वार, विद्याधर ताठे, किरण इनामदार, दीपक मोकाशी, स्वाती लोंढे-चव्हाण ः भारत इतिहास संशोधक मंडळाचे राजवाडे सभागृह, भरत नाट्य मंदिराजवळ ः ११.००.
सायंकाळी ः
सांगीतिक अभिवाचन ः वंचित विकास आयोजित ः सांगीतिक अभिवाचन- येसूवहिनी व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातील दीर-भावजयीच्या नात्याचे बंध उलगडून दाखविणारे ‘मी...येसूवहिनी’ ः निवारा सभागृह, एस. एम. जोशी हॉलसमोर, नवी पेठ ः ५.००.
एकपात्री नाटक ः दलित स्वयंसेवक संघ आयोजित ः ‘लोकराजा शाहू महाराज’ एकपात्री नाटक ः लेखक सादरकर्ते- कुमार आहेर ः साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे ग्रंथालय, के. ब्लॉक, नेहरू स्टेडियम, सारसबागेसमोर, स्वारगेट ः ५.००.
सांगता समारंभ ः वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ ः उपस्थिती- नीलेश ओक ः अध्यक्षा- डॉ. गीताली टिळक ः उपस्थिती- डॉ. मेधा कुलकर्णी ः ‘प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र’ नीलेश ओक यांचे व्याख्यान ः ‘स्मृतिगंध’ स्मरणिका, कै. परशुराम परांजपे यांनी लिहिलेल्या निवडक सन्मानपत्रांचा संग्रह असलेले पुस्तक, तसेच डॉ. ज्योत्स्ना खरे लिखित ‘सार्थ श्रीविष्णुसहस्रनाम’ पुस्तकाचे प्रकाशन ः टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता ः ५.३०.
संगीत सोहळा ः गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे ः पं. विनायकराव पटवर्धन यांच्या ५०व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त ः संगीत सोहळा ः डॉ. प्रकाश कुलकर्णी, अपर्णा गुरव, जयंत केजकर (गायन) ः साथसंगत- पं. प्रमोद मराठे (संवादिनी)ः मिलिंद गुरव, श्रीपाद शिरवळकर (तबला) ः गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिर, शनिवार पेठ ः ५.४५.
पुरस्कार वितरण ः महेश प्रोफेशनल फोरमतर्फे ः महेश गौरव पुरस्कार ः पुरस्कारार्थी- किशन भुतडा, डॉ. सोनल चांडक ः डॉ. श्यामराव कलमाडी हायस्कूल ऑडिटोरियम, गणेशनगर, एरंडवणे ः ६.००.
कृतज्ञता समारंभ ः भोई प्रतिष्ठान आयोजित ः ‘अमली पदार्थमुक्त गणेशोत्सव २०२४’ मध्ये सहभागी होऊन अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कार्यरत असणाऱ्या भक्तांसाठी कृतज्ञता समारंभ ः प्रमुख पाहुणे- डॉ. मेधा कुलकर्णी, हेमंत रासने, श्रीकांत भारतीय, रंजनकुमार शर्मा, प्रवीण पाटील ः लेडी रमाबाई हॉल, स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता ः ६.००.
रंग भक्तीचे ः स्वरगायत्री प्रतिष्ठान आयोजित ः अभंग, भक्तिरचना गायन कार्यक्रम- रंग भक्तीचे ः सादरकर्त्या- चारुशीला बेलसरे ः डॉ. अरविंद नेरकर यांचे विशेष निरूपण ः प्रमुख पाहुण्या- मंजूषा राजगुरू ः अध्यक्ष- श्रीकृष्ण केळकर ः पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ ः ६.००.
दृक्-श्राव्य कार्यक्रम ः ॲड-व्हेंचर फाउंडेशन आयोजित ः मारुती चितमपल्ली यांना आदरांजलीचा कार्यक्रम व त्यांच्या जीवनावर आधारित निसर्गविषयक दृक्-श्राव्य सादरणीकरण ः श्री महालक्ष्मी सभागृह, आदित्य हॉल, मित्रमंडळ चौकाजवळ, पर्वती पायथा ः ६.००.
सांगीतिक कार्यक्रम ः संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान संचालित गुरुकुलतर्फे ः नवनवोन्मेष- सांगीतिक कार्यक्रम ः सहभाग- नूपुर देसाई, साहिल भोगले (गायन), मृगेंद्र मोहडकर (एकल बासरीवादन), साथसंगत- पार्थ ताराबादकर (तबला), मालू गावकर (संवादिनी) ः उपस्थिती- श्रीकांत कडुस्कर ः बेडेकर गणपती
मंदिर सभागृह, पौड रोड, कोथरूड ः ६.००.
सांगीतिक कार्यक्रम ः आरती प्रभू यांच्या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेणारा कार्यक्रम- ‘गेले द्यायचे राहून’ ः सादरकर्ते- अंजली मराठे, आशुतोष कुलकर्णी, श्रीराम पेंडसे, प्रभा जोशी, मिलिंद गुणे, आनंद खळदकर, सचिन माईणकर, वासुदेव बापट आणि विवेक परांजपे ः राजलक्ष्मी कला दर्शन सभागृह, कोथरूड ः ६.००.
एकपात्री प्रयोग ः हिंदीतील एकपात्री प्रयोग- सूरदास ः सादरकर्ते- शेखर सेन ः एमईएस सभागृह, कोथरूड ः ६.३०.
..........
...............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.