कोरियन भाषेच्या ‘टोपिक’ 
परीक्षेसाठी पुण्यात केंद्र

कोरियन भाषेच्या ‘टोपिक’ परीक्षेसाठी पुण्यात केंद्र

Published on

पुणे, ता. २३ : कोरियाच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशनच्या (एनआयआयईडी) वतीने ‘टोपिक’ परीक्षेसाठी बालेवाडीमधील यूथबिल्ड फाउंडेशनच्या आवारातील इंडो-कोरियन सेंटरला (आयकेसी) अधिकृत टोपिक संस्था आणि परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे, अशी माहिती इंडो कोरियन सेंटर आणि किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम आणि इंडो कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीब घटक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. लिम म्हणाल्या, ‘‘कोरियाच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडो कोरियन सेंटरमार्फत विद्यार्थी, व्यावसायिक आणि कोरियन विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण अथवा रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेले प्रमाणपत्र मिळणार आहे. १९९७ पासून सुरू असलेली ‘टोपिक’ परीक्षा ही कोरियन सरकारची अधिकृत भाषा प्रावीण्य चाचणी आहे. वाचन, लेखन आणि श्रवण कौशल्य तपासणारी ही परीक्षा आहे. कोरियन विद्यापीठांमध्ये प्रवेश, कोरियन कंपन्यांमध्ये नोकरी, व्हिसा प्रक्रिया तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी या परीक्षेचे प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते. ‘टोपिक-१’ (प्राथमिक स्तर १ व २) आणि ‘टोपिक-२’ (मध्यम व उच्च स्तर ३ ते ६) असे या परीक्षेचे दोन प्रकार आहेत. या प्रमाणपत्राची वैधता दोन वर्षे असते.’’
‘टोपिक’ परीक्षा आता १६ नोव्हेंबरला होणार असून प्रत्येक सत्रात २०० विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध असणार आहेत. या परीक्षेसाठी नोंदणी मंगळवारपासून (ता. २६) सुरू होत आहे, असेही डॉ. लिम यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com