राजगड गृहनिर्माण सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक
पुणे, ता. २५ : हडपसर येथील राजगड गृहनिर्माण सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक उत्साहात पार पडली. सोसायटीच्या नव्या संचालक मंडळासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये ३४० सदस्यांपैकी १९५ जणांनी मतदान केले.
यावेळी २७ उमेदवारांनी संचालक मंडळासाठी अर्ज भरले होते, त्यापैकी १७ उमेदवार निवडून आले. नवनिर्वाचित संचालकांमध्ये श्रीपाद जोशी, बालाजी कांबळे, सिद्धार्थ सिध्दुल, अतुल पाटील, रज्जाक शेख, चंद्रकांत जावळे, नीलम शिर्के, उषा चौधरी, जयश्री माळवदकर, छाया टेकवडे, पार्वती कुर्मे, सुर्यकांत भोसले, नरेंद्र अहिरे, दीपक मोरे, जान्हवी भोकरे, सुजाता सूर्यवंशी यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यशपाल मखरे यांनी जबाबदारी सांभाळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.