सुवर्ण गणेशमूर्तींच्या सूक्ष्म कलाकृती पाहण्याची संधी
पुणे, ता. २७ : एक मिलिमीटरपासून ते अवघ्या सव्वा स्क्वेअर इंच जागेत सोन्यामध्ये साकारलेल्या विविध सूक्ष्म गणेशमूर्तींच्या अनेक दुर्मीळ कलाकृती यंदाच्या गणेशोत्सवात शुक्रवार (ता. २९) ते मंगळवार (ता. २ सप्टेंबर) दरम्यान ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘सूक्ष्म सुवर्ण गणेशमूर्ती कलाकृती’ प्रदर्शनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसोबतच सर्व वयोगटातील नागरिकांना पाहता येणार आहेत.
‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ एनआयई’ (न्यूज पेपर इन एज्युकेशन) आणि ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ यांच्या वतीने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील सिद्धिविनायक ग्रुप असून, सहयोगी प्रायोजक इंद्रिया ज्वेलर्स आहेत. याशिवाय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे उपक्रमास सहकार्य लाभले आहे.
या प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातील गणेशभक्त, कलाकार व जागतिक विक्रमवीर भगवानदास खरोटे यांनी (०.७६ एम.एम.) कमीतकमी जागेत एक मिलिमीटरपासून अवघ्या सव्वा स्क्वेअर इंच जागेत सोन्यामध्ये साकारलेल्या विविध सूक्ष्म गणेशमूर्ती पाहता येणार आहेत. खरोटे यांनी सोन्यामध्ये साकारलेल्या गणेशमूर्ती इतक्या सूक्ष्म आहेत की, त्या सूक्ष्मदर्शीकेशिवाय पाहता येत नाहीत.
खरोटे यांनी तब्बल २५६ सूक्ष्म सुवर्ण गणेश साकारले असून, यामध्ये तबलावादक, सनईवादक, हार्मोनियम वादक, झुल्यावर बसलेला, हातात तिरंगा घेतलेला, चहाची किटली आणि कपबशी घेऊन उभा असलेला श्रीगणेश ते विविध रत्नांवर अगदी मोत्यापासून ते पाचूपर्यंत गणेशाचे रूप साकारले आहे.
प्रदर्शनाविषयी....
कधी : २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर
कोठे : राजा रवी वर्मा कलादालन, घोले रस्ता, पुणे
केव्हा : सकाळी १०.३० ते रात्री ७
संपर्क : ८३७८९९३४४६/ ९८८१५९८८१५/ ९१३०००४९५५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.