गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर २९ गुंड तडीपार
बाणेर, येरवडा, खराडी, वाघोली, कात्रज परिसरात कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर २९ गुंड तडीपार बाणेर, येरवडा, खराडी, वाघोली, कात्रज परिसरात कारवाई

Published on

पुणे, ता. २७ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी २९ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, चंदननगर, खराडी, वाघोली, लोणीकंद परिसरातील २६ सराईतांना तडीपार करण्याचे आदेश दिले. तर परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडांना तडीपार करण्याचा आदेश दिला.
परिमंडळ चारच्या हद्दीतील १०० हून अधिक सराईतांच्या हालचालीवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. त्यांच्याविरुद्धही लवकरच प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. तडीपार केलेले आरोपी पुन्हा शहरात आल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिमंडळ चारमधील तडीपार केलेल्या गुंडांची नावे ः शिवाजी लक्ष्मण रामावत (वय ३० रा. लमाणतांडा, पाषाण), सचिन अशोक रणपिसे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सूरज ऊर्फ किल्ल्या कैलास बाणेकर (वय ३५, रा. येरवडा), महम्मद ऊर्फ रहीम रहेमान शेख (वय १९, रा. येरवडा), सलमान चाँदबाशा शेख (वय ३० रा. वाघोली), महेश बलभीम सरोदे (वय २२, रा. येरवडा), सुंदर ऊर्फ कुबड्या राजाराम मेत्रोळ (वय ३५, रा. पर्णकुटी, येरवडा), नंदकुमार संजय पासंगे (वय २२, रा. कामराजनगर, येरवडा), आशा सीताराम राठोड (वय ४८, रा. येरवडा), शांताबाई गोविंद राठोड (वय ५०, रा. नाईकनगर, येरवडा), नीता सुनील नगरकर (वय ६३, रा. वडगावशेरी), गणेश प्रकाश जाधव (वय १९, रा. बाणेर), प्रेम विकी ससाणे (वय १९, रा. येरवडा), मानकीबाई कमलेश चव्हाण (वय ५०, रा. येरवडा), सोनाबाई बासू राठोड (वय ६०, येरवडा) मुन्नीबाई रेड्डी राठोड (वय ५०, रा. नाईकनगर, येरवडा), अंबू राजू धोत्रे (वय ४९, रा. गोखलेनगर), गणेश उत्तम वाघमारे (वय २२, रा. चंदननगर), नीलेश राहुल वाघमारे (वय २५, रा. थिटे वस्ती, खराडी), सत्यम राजू चमरे (वय २४, रा. पेरणे, हवेली), महम्मद हुसेन खान (वय २२, रा. गाडीतळ, येरवडा), गोपाळ संजय यादव (वय २६, रा. बकोरी रोड, वाघोली), शशी पांडू चव्हाण (वय ४२, रा. नाईकनगर, येरवडा), मोहन बागीवान जाधव (वय ४१, रा. जनवाडी, गोखलेनगर), हबीब इबालू इराणी (वय २३, रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर), कमल सुभाष चव्हाण (वय ३६, रा. नाईकनगर, येरवडा).

कात्रजमधून तडीपार केलेले गुंड ः
कात्रज भागातील तीन सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. अभय ऊर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय २०, रा. सिद्धिविनायक कॉलनी, आंबेगाव खुर्द), विनोद दिलीप धरतीमगर (वय २२, रा. आंबेगाव बुद्रुक) आणि प्रथमेश ऊर्फ अभय देविदास कुडले (वय २१, रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक) अशी तडीपार केलेल्या गुंडांची नावे आहेत. तिघांना पुणे शहर, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तडीपार करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी तयार केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com