राज्य सरकारकडून गणेशभक्तांची दिशाभूल

राज्य सरकारकडून गणेशभक्तांची दिशाभूल

Published on

पुणे, ता. १ : राज्य सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गणेशोत्सव संपत आला तरी, त्या बाबतचा अधिकृत शासकीय निर्णयाचा आदेश (जीआर) अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. त्यामुळे ही घोषणा केवळ सवंग लोकप्रियतेसाठी केली आहे. तसेच राज्य सरकारने गणेशभक्तांची दिशाभूल केली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे.
गणेशोत्सव राज्य महोत्सव असेल. त्यात कोणत्या संकल्पना आहेत, त्याची अंमलबजावणी कशी होणार, त्यासाठी आर्थिक तरतूद किती असेल, तिचा विनियोग कसा होईल, या बाबत अद्याप कोणालाही काही माहिती नाही. जिल्हाधिकारी कार्यालयही त्याबाबत अनभिज्ञ आहे. तसेच गणेशोत्सवात सहभागी मूर्तिकार, कलाकार, मंडपवाले, वाद्यवादक, पौरोहित्य करणारे, सेवेकरी, ढोल-ताशा पथकांचे साहित्य व सजावट साहित्य व सेवांवरील ‘जीएसटी’ अद्याप माफ झालेला नाही. तसेच हा उत्सव सुरक्षित आणि शांतपणे पार पाडण्यासाठी पोलिसांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत. या उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्याने सार्वजनिक गणेश मंडळांना काय उपयोग होणार, या बाबतही अद्याप खुलासा झालेला नाही. त्यामुळे विधी मंडळात सुमारे एका महिन्यापूर्वी केलेली घोषणा पोकळ ठरली असून राज्य सरकारच्या स्टंटबाजीचे हे आणखी एक उदाहरण आहे, अशी टीका तिवारी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com