मुलांचे होणार गोवर-रूबेला लसीकरण

मुलांचे होणार गोवर-रूबेला लसीकरण

Published on

पुणे, ता. २ : शहरातील आश्रमशाळा, अनाथाश्रमांमधील ५ ते १५ वर्षे वयोगटांतील मुलांची गोवर-रूबेला (एमएमआर) लसीकरण मोहीम १५ सप्‍टेंबरपासून राबविण्‍यात येणार आहे. याबाबत महापालिकेला मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त झाली असून, पहिल्या टप्प्यात ६४८ मुलांचे गोवर-रुबेला लसीकरण होणार आहे. यासाठी लसीचा साठा, प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे.

गोवर आणि रुबेला हे दोन्ही विषाणूंमुळे होणारे संसर्गजन्य आजार आहेत. हे मुख्यतः मुलांमध्ये आढळतात. राज्यात जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांमध्ये काही महिन्‍यांपूर्वी गोवर- रुबेलाचा प्रादुर्भाव खासकरून आश्रमशाळा, अनाथाश्रमांमधील मुलांना झाला होता. अशा संस्थांमध्ये मुले एकत्र राहतात, झोपतात आणि शिकतात. त्यामुळे संसर्गजन्य आजार झपाट्याने पसरतो. गोवर आणि रुबेला हे दोन्ही आजार श्वसनमार्गाने (खोकला-शिंका) सहज पसरणारा संसर्गजन्‍य आजार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक रुग्ण आढळले होते. या पार्श्वभूमीवर १५ सप्टेंबरपासून शहरातील आश्रमशाळा, अनाथाश्रमांमधील विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लसीकरण सुरक्षित आहे. जर प्रतिकूल परिणाम उद्भवला तर त्‍याच्‍या नियंत्रणासाठी काटेकोर नियमावली आखली आहे. परिमंडळ वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी हे अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती सहाय्यक आरोग्‍य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी दिली.


नक्की काय करणार?
१) १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान ५ ते १५ वर्षे वयोगटांतील आधी लस घेतलेल्या किंवा न घेतलेल्या मुलांना एमआर लसीचा अतिरिक्त डोस देणार
२) महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ५८ दवाखाने आणि २० प्रसूतीगृहांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले
३) १५० मुलांसाठी एक लसीकरण अधिकारी आणि सहा जणांचे पथक नियुक्त करणार
४) सध्या ४८ हजार ८०० डोस उपलब्ध असून शीत साखळीची तयारी पूर्ण
५) वैद्यकीय अधिकारी, ५८ दवाखाने आणि २० प्रसूतिगृह सज्ज
६) शिक्षणविभाग, आयएमए, बालरोगतज्ज्ञ संघटना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रतिनिधींची बैठक होणार
७) राज्यस्तरीय प्रशिक्षण बुधवारी यशदा येथे पार पडणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com