विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रमुख १७ रस्ते वाहतुकीसाठी बंद
पुणे, ता. ४ : शहरात गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी (ता. ६) सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख १७ रस्ते सकाळी सात वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहतील. शनिवारी पहाटेपासून पुढील ४८ तास शहरात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी राहील. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी याबाबत आदेश काढून पर्यायी मार्ग आणि पार्किंगची व्यवस्था निश्चित केली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी बंद रस्ते :
शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व लक्ष्मी रस्ता, सकाळी १० वाजल्यापासून बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, केळकर रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, दुपारी १२ नंतर लालबहादूर शास्त्री रस्ता, सायंकाळी चार वाजल्यापासून जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता (नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक), फर्ग्युसन रस्ता (गोपाळ कृष्ण गोखले रस्ता), भांडारकर रस्ता, सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता तसेच, सकाळी नऊ वाजल्यापासून बगाडे रस्ता, गुरूनानक रस्ता आदी मार्गांवर मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक बंद राहील.
डायव्हर्शन पॉइंट्स :
झाशीची राणी चौक (जंगली महाराज रस्ता), गाडगीळ पुतळा (शिवाजी महाराज रस्ता), अपोलो टॉकीज (दारूवाला पूल), संत कबीर चौकी (लक्ष्मी रस्ता), स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक (बाजीराव रस्ता), सेव्हन लव्हज चौक (सोलापूर रस्ता), व्होल्गा चौक (सातारा रस्ता) आदी महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक वळविण्यात येणार (डायव्हर्शन) आहे.
रिंगरोड व पर्यायी मार्ग :
वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता म्हणून रिंगरोडची (वर्तुळाकार मार्ग) आखणी केली आहे. शहराबाहेर पडण्यासाठी वाहनचालकांनी या पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर करावा. कर्वे रस्ता- नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता- गणेशखिंड रस्ता- सिमला ऑफीस चौक- संचेती हॉस्पिटल- इंजिनिअरिंग कॉलेज चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता- शाहीर अमर शेख चौक- मालधक्का चौक, बोल्हाई चौक- नरपतगिरी चौक- पंडित नेहरू रस्ता- संत कबीर पोलिस चौकी- सेव्हन लव्हज चौक- वखार महामंडळ चौक- गुलटेकडी- मार्केटयार्ड चौक- सातारा रस्ता- व्होल्गा चौक- मित्रमंडळ चौक- सिंहगड रस्ता- लाल बहादूर शास्त्री रस्त्याने सेनादत्त पोलिस चौकी- म्हात्रे पूल ते नळ स्टॉप या वर्तुळाकार मार्गावर विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत दुहेरी वाहतूक सुरु राहील.
नो-पार्किंग क्षेत्र :
लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, लोकमान्य टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यांवर नो-पार्किंग लागू राहील.
उपनगरातील वाहतूक बदल :
धायरी फाटा चौक ते नांदेड फाटा, उंबऱ्या गणपती चौकाकडे रस्त्यावर शनिवारी सायंकाळी सहा ते मध्यरात्रीपर्यंत वाहतूक बंद राहील. त्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. केशवनगर, मुंढवा आणि ससाणेनगर, हडपसर परिसरात सकाळी सहा वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीत बदल राहील. काळेपडळ, नवनाथ चौक, डी. मार्ट, ससाणेनगर अंडरपास परिसरात पर्यायी मार्ग वापरावा लागेल.
पार्किंग व्यवस्था :
दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी :
- शिवाजी आखाडा वाहनतळ
- एआयएसएसपीएमएस मैदान
- एसपी महाविद्यालय
- संजीवनी वैद्यकीय महाविद्यालय मैदान
- फर्ग्युसन महाविद्यालय
- जैन वसतिगृह
- बीएमसीसी रस्ता मैदान
- नदीपात्रात भिडे पूल ते गाडगीळ पूल
केवळ दुचाकी वाहनांसाठी :
- पेशवे पार्क सारसबाग
- पाटील प्लाझा पार्किंग
- दांडेकर पूल ते गणेशमळा
- गणेशमळा ते राजाराम पूल
- नीलायम टॉकीज
- मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.