विसर्जनासाठी महापालिकेची तयारी
पुणे, ता. ४ : शहरातील गणेशोत्सव मोठ्या आनंदोत्साहात पार पडत आहे. विशेषतः घरगुती गणपती, गौरी-गणपती विसर्जनानंतर भाविकांची पावले गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी वळू लागली आहे. तर, दुसरीकडे शनिवारी (ता. ६) गणपती विसर्जनामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहू नये, यादृष्टीने महापालिकेकडून उपाययोजना करण्यात आल्या आहे. विसर्जन घाट, पाण्याच्या टाक्या, विसर्जन मार्गावरील स्वच्छता, भाविकांसाठी स्वच्छतागृहांपासून नदीपात्रातील सुरक्षिततेसंदर्भातील उपाययोजना करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे.
गणेशोत्सव अखेरच्या टप्प्यात आल्याने भाविकांची देखावे पाहण्यासाठी लगबग सुरु आहे. तर, दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून विसर्जनासाठीची व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. गणपती विसर्जनासाठी भाविक मोठ्या संख्येने मध्यवर्ती भागात येतात. त्यामुळे महापालिकेने भाविकांसाठी सर्व रस्त्यांवर स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावरील स्वच्छतेवर भर दिला जाणार आहे, तर विसर्जन घाटावरही मूर्ती विसर्जनापासून मूर्ती संकलन करण्यासाठी कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे.
मानाच्या गणपतींची विसर्जन व्यवस्था
- पतंगा घाट : कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ
- पांचाळेश्वर घाट : तुळशीबाग गणपती, केसरीवाडा गणपती
महापालिकेचे आवाहन
- नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जन करू नये
- पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास प्राधान्य द्यावे
- मूर्ती विसर्जनासाठी कृत्रीम हौदांची व्यवस्था
- मूर्ती दानासाठी महापालिकेकडून जनजागृतीवर भर
१५ क्षेत्रीय कार्यालयांनी केलेली व्यवस्था
३८
- बांधलेले हौद
६४८
- २८१ ठिकाणी लोखंडी टाक्या
२४१
- मूर्ती संकलन केंद्र
३२८
- निर्माल्य कंटेनर/कलश व्यवस्था
४६
- शाडू मूर्ती संकलन केंद्र
विसर्जन गणपती मूर्तींची संख्या
२५ हजार ४८२
- बांधलेल्या हौदातील मूर्ती
१ लाख १६ हजार ९३५
- लोखंडी टाक्या
४५ हजार ९७३
- संकलन केलेल्या मूर्ती
१ लाख ८८ हजार ३९०
- गणपती मूर्ती विसर्जन
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मनुष्यबळ
२५०
- अधिकारी
७००
- कर्मचारी
१२००
- स्वच्छता कर्मचारी
स्वच्छतेची व्यवस्था :
- सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, मोकळ्या जागा, क्रॉनिक स्पॉट, नदीपात्र, नदीघाट, विसर्जन हौदांची ठिकाणे, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे परिसरात स्वच्छतेवर भर.
- विसर्जन मार्गावर स्वच्छतेसाठी आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
- शहरातील सार्वजनिक व वस्ती पातळीवरील शौचालये मोफत
- पोर्टेबल स्वच्छतागृहे - २५८० (महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत)
गणपती मूर्ती विसर्जन व्यवस्थेमध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. शहरातील विसर्जन मार्गांसह विसर्जन घाट व अन्य सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. भाविकांसाठी ठिकठिकाणी पोर्टेबल स्वच्छतागृहांची व्यवस्था केलेली आहे.
- संदीप कदम,
प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.