महिलांच्या सहभागाने चैतन्याची ऊर्जा ! पारंपरिक वेशभूषेसह नृत्य, लेझीम, मर्दानी खेळांमुळे मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण
पुणे, ता. ७ : महिलांच्या उत्साही सहभागाने गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला चैतन्याची ऊर्जा दिली. मानाच्या पाचही गणपतीसह पाठोपाठ येणाऱ्या त्वष्टा कासार समाजाच्या मंडळात महिलांचे वर्चस्व होते. त्यामुळे विविध मंडळातील व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत पारंपरिक वेशभूषेसह बहारदार नृत्य, लेझीम, मर्दानी खेळ, ढोल ताशा वादन करत महिलांनी नोंदवलेल्या सहभागाने मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली.
शिवगर्जना, रुद्र, शिवप्रताप, स्वरूपवर्धिनी, ज्ञानप्रबोधिनी, शिवमुद्रा, परशुराम आदी ढोल पथकात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. भगव्या, हिरव्या, नारंगी, लाल, पिवळ्या अशा विशिष्ट रंगांच्या नऊवारी साड्या व दागिने परिधान करून मंडळांसोबत सहभागी होऊन महिला आपल्या मंडळाची ओळख दर्शवत होत्या. मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाच्या व्यवस्थापनात महिलांचा सहभाग अधिक दिसून आला. मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाच्या पथक वादनात वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा केलेल्या तरुणी व महिला वेगवेगळ्या ठेक्यावर सादर केलेले लेझीम लक्षवेधी ठरले. त्यातील काहींनी ढोलताशाच्या तालावर नृत्य केले. केशव शंखनाद पथकातही महिलांची संख्या अधिक होती. तसेच नऊवारी साड्या नेसलेल्या महिलांनी सादर केलेले शौर्यपूर्ण मर्दानी खेळ उपस्थितांना शहारे आणणारा होते. अशा खेळांमध्ये तलवारबाजी, काठीचा वापर आदींचा समावेश होतो. या खेळांमध्ये स्त्रियांचा पराक्रम आणि कौशल्य दिसून आले. मिरवणूक पाहण्यास आलेल्यांनीही हलगी व लेझीम पथकाला दाद दिली. ‘मोरया’च्या गजरात मिरवणूक पुढे सरकली. तसेच महिलांनी फुगड्यांचा फेर दिला. झांज वाजवणाऱ्या युवती, लेझीम खेळणाऱ्या मुलींनी अनेक मंडळांचे चैतन्य वाढवले. काही महिलांना मिरवणुकीत वेगळे स्थान देण्यासाठी मंडळाने विशेष व्यवस्था केली होती. महिलांच्या सहभागामुळे मिरवणुकीत भक्तिपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
फोटोः 47534, 47524, 47523, 47531, 47522, 47383
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.