तरुणार्इचा उत्साह आणि अभूतपूर्व गोंधळ  
टिळक रस्ता

तरुणार्इचा उत्साह आणि अभूतपूर्व गोंधळ टिळक रस्ता

Published on

पुणे, ता. ७ : ढोल- ताशा पथकांच्या वादनानंतर रात्री सुरू झालेला ध्वनिवर्धकांचा (डीजे) दणदणाट...संध्याकाळी सातनंतर रस्त्यावर थिरकणारी तरुणाई...यंदाही पूरम चौक ते एसपी कॉलेजपर्यंत अभूतपूर्व गोंधळ... प्रचंड गर्दी आणि तीन ते चार ठिकाणी नाचताना एकमेकांना धक्का लागल्याने दोन गटांत झालेली जोरदार हाणामारी अशा वातावरणात टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक पार पडली.
शनिवारी रात्री आठपर्यंत टिळक रस्त्यावरून केवळ सहा गणेश मंडळे टिळक चौकात पोचले होते. चिमणबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पहिले मंडळ सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी टिळक रस्त्यावरून चौकात आले. दोन मंडळात मोठे अंतर असल्याने मिरवणूक संथगतीने पुढे जात होती. यंदा या मार्गावर एकूण ३१ तास ३४ मिनिटे मिरवणूक चालली. गेल्यावर्षी या मार्गावरील मिरवणूक २७ तास ४५ मिनिटांनी तर २०२३ ला २८ तास २५ मिनिटांनी मिरवणूक संपली होती. या विसर्जन मार्गावरून एकूण १८८ मंडळे मार्गस्थ झाली. सर्वाधिक मंडळे ही रविवारी (ता. ७) सकाळी आठ ते १० दरम्यान टिळक चौकात दाखल झाली होती.
शनिवारी संध्याकाळी सातनंतर मिरवणुकीस रंग चढला. तरुणार्इ मराठी, हिंदी गाण्यां‍वर थिरकली. त्याचबरोबर ढोल- ताशांच्या वादनावरदेखील तरुणाईने नृत्य केले. गणपतीचा जयघोष आणि मराठी -हिंदी गाणे म्हणत रात्री बारापर्यंत तरुणाईने ध्वनिवर्धकांवर ठेका धरला. रात्री बारानंतर वादन बंद केल्यानंतर टिळक रस्त्यावर मंडळांची रांग लागली होती.
विसर्जन मिरवणुकीत नवी पेठेमधील राणाप्रताप मित्र मंडळाने हनुमानाचा हलता देखावा तयार केला होता तर दत्तवाडीमधील बाळ शिवाजी मित्र मंडळाने फुलांची आकर्षक आरास तयार केली आहे. हत्ती गणपतीचा रथ आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळाने केलेल्या आकर्षक फुलांच्या सजावटीने गणेश भक्तांचे लक्ष वेधले. बहुतांश मंडळांनी मिरवणुकीसाठी विविध प्रकारचे रथ आणि आकर्षक विद्युत रोषणार्इ केली होती.

हाणामारीच्या घटना आणि प्रचंड गर्दी
एसपी कॉलेजजवळ दोनदा आणि विजय सेल्ससमोर एक अशा तीनदा तरुणांच्या दोन गटांत जोरदार हाणामारीच्या घटना घडल्या. यातील एका घटनेत एका तरुणीलादेखील मारण्यात आले. यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री आठनंतर या मार्गावरील मिरवणूक रेंगाळली होती. त्यामुळे ज्या मंडळाच्या समोर गाणे सुरू आहेत. तेथे मोठी गर्दी झाली होती. नागरिकांना चालणे देखील अवघड झाले होते.

मिरवणुकीतील आकर्षक देखावे
- श्रीमंत यशवंतनगर मित्र मंडळाने आकर्षक असा महल तयार केला होता
- नेहरू तरुण मित्र मंडळाचा विश्वेश्वर रथ व त्याच्या आकर्षक विद्युत रोषणार्इने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
- चिमण्या गणपती मंडळाच्या शिवतांडव रथाचा फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती
- अष्टविनायक मित्र मंडळाने साकारलेले फुलांचे गजराज चिमुकल्यासह सर्वांच्या पसंतीस उतरले
- शिवांजली मित्र मंडळाने हनुमान रथ साकारला होता

टिळक रस्त्यावरील मिरवणुकीची वेळ :
वर्ष - कालावधी
२०१८ ः २४ तास २० मिनिटे
२०१९ ः २२ तास १५ मिनिटे
२०२२ ः २३ तास २० मिनिटे
२०२३ ः २८ तास २५ मिनिटे
२०२४ ः २७ तास ४५ मिनिटे
२०२५ ः ३१ तास ३४ मिनिटे

वर्ष - मंडळांची संख्या :
२०१९ ः १२२
२०२२ ः १९७
२०२३ ः १९६
२०२४ ः १७०

२०२५ ः १८८

फोटोंचे नंबर -

4745३
टिळक रस्ता ः हत्ती गणपती मंडळची गजरथामध्ये विराजमान झालेली गणेशमूर्ती.


47452
टिळक रस्ता ः श्री स्वामी समर्थ पुष्प रथावर विराजमान झालेली श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळाची श्री सरस्वती-गजाननाची मूर्ती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com