सोशल मीडियातही रंगली मिरवणूक
पुणे, ता. ७ : यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील पारंपरिक थाटासोबत डिजिटल उत्साहही दिसून आला. ढोल-ताशांच्या गजरात, सजवलेल्या देखाव्यांमध्ये नटलेली मिरवणूक रस्त्यावर जितकी रंगत होती तितकीच तिची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि ‘एक्स’वरून नागरिकांनी थेट प्रसारण केले. अनेकांनी मिरवणुकीतील गणरायाचे व्हिडिओ, छायाचित्रे, रांगोळ्या, झांजपथकाचे परफॉर्मन्स शेअर करून देश-विदेशातील भाविकांना दर्शन घडवले.
भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशा शुभेच्छा एकमेकांना ऑनलाइन देत उत्सव साजरा केला. कुटुंबीय, मित्र-नातेवाईक यांच्यासाठी ‘व्हर्च्युअल मिरवणूक’ तयार झाली होती. #PuneGaneshVisarjan, #Visarjan2025, #BappaMorya आणि #GaneshotsavLive हे हॅशटॅग दिवसभर ‘ट्रेंडिंग’मध्ये राहिले. अनेक गणेश मंडळांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल्सवरून सतत अपडेट्स, थेट व्हिडिओ आणि वाहतुकीची माहिती देत भाविकांशी संपर्क ठेवला. विसर्जनाच्या थेट प्रसारणांना हजारोंच्या संख्येने ‘लाईक’, ‘शेअर’ आणि ‘कॉमेंट्स’ मिळाल्या. काही व्हिडिओंना काही मिनिटांतच लाखो ‘व्ह्यूज’ मिळाले.
या डिजिटल उत्सवामुळे पुण्यातील मिरवणुकीचा सोहळा केवळ प्रत्यक्ष उपस्थित भाविकांपुरता मर्यादित न राहता जगभर पोहोचला. पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम ठरलेल्या या विसर्जन मिरवणुकीला सोशल मीडियावर मिळालेला जबरदस्त प्रतिसाद हा यंदाच्या गणेशोत्सवाचा खास आकर्षणबिंदू ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.