बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हा
पुणे, ता. ७ : आयुष कोमकर याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
टोळीयुद्धातून आयुष कोमकर (वय १८, रा. भवानी पेठ) याचा नाना पेठेत शुक्रवारी सायंकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. याप्रकरणी कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार समर्थ पोलिस ठाण्यात सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६८), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४०), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), अमन युसूफ पठाण ऊर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे (वय १९), सुजल राहुल मेरगू (वय २३, सर्वजण रा. नाना पेठ) या १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा आरोपींना पोलिस कोठडी
या प्रकरणी अटक केलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ‘वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी पूर्वनियोजित कट रचला. अमन पठाण आणि यश पाटील याने आयुषवर गोळीबार केला. त्यावेळी अमित पाटोळे व सुजल मेरगू घटनास्थळी हजर होते. गोळीबारानंतर ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे म्हणत आरोपींनी दहशत माजविली. घटनास्थळी १२ काडतुसे आणि एक अर्धवट काडतूस सापडले असून, मृतदेहात नऊ काडतुसे आढळली आहेत. तपास करण्यासाठी आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी द्यावी,’ असा युक्तिवाद सरकारी वकील दिलीप गायकवाड यांनी केला.
अॅड. प्रशांत पवार व अॅड. मिथुन चव्हाण यांनी आरोपींची बाजू मांडली. आंदेकर व कोमकर कुटुंबात दिवाणी स्वरूपाचे वाद असून, वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. अटक आरोपींचा गुन्ह्याशी संबंध नाही, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांच्या न्यायालयाने आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.