कंत्राटी कामे क्लब करून 
निविदा न काढण्याचा निर्णय
जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांची माहिती

कंत्राटी कामे क्लब करून निविदा न काढण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांची माहिती

Published on

पुणे, ता. ८ ः जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजन समिती निधीतून होणाऱ्या कामांच्या निविदा यापुढे क्लब करून काढल्या जाणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषदेने यावर्षी मॉडेल स्कूल योजनेअंतर्गत सुमारे २५० कोटी रुपयांची आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जवळपास ७६ कोटी रुपयांची कामे क्लब करून निविदा काढल्या होत्या. या धोरणाचा ठेकेदारी संघटना व ठेकेदारी महासंघाने विरोध केला होता. क्लब करून निविदा काढल्यामुळे छोटे ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच मजूर सहकारी सोसायट्यांना काम मिळाली पाहिजेत, असा सूर ठेकेदार संघटनांचा होता. याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन तसेच बैठकीतून आक्षेप नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. येथून पुढे जिल्हा परिषद निधी, जनसुविधा, ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्गांच्या कामांसाठी निविदा प्रचलित पद्धतीनेच काढल्या जातील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Marathi News Esakal
www.esakal.com